मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सर्वोच्च पसंती दिली. पण पराग अग्रवाल यांना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महत्त्वाचे पद देण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांच्यात असलेली अनेक गुणवैशिष्ट्ये याला कारणीभूत आहेत.
मायक्रो-ब्लॉगिंगचा उत्तराधिकारी म्हणून अग्रवाल यांना ओळखले जाते. ते त्यांच्या शैक्षणिक काळातही नाविन्यपूर्ण विद्यार्थी होते. अग्रवाल यांनी IIT संयुक्त प्रवेश परीक्षेत ७७ वा क्रमांक मिळवून IIT-बॉम्बे येथील संगणक विज्ञान विभागात प्रवेश घेतला. प्रोफेसर सुप्रतीम बिस्वास, आयआयटी-बी मधील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे माजी प्रमुख त्याच्याबद्दल बोलताना म्हणाले, तो एक हुशार विद्यार्थी होता, त्याने माझ्यासोबत दोन कोर्स केले आणि तो त्याच्या डिपार्टमेंटमधून अव्वल म्हणून पदवीधर झाला.
पराग यांचे शिक्षक प्रवीण त्यागी यांनी त्यांच्याबद्दल आठवण सांगितली की, २००० साली जेव्हा पराग IIT-JEE ची परीक्षा देत होते, तेव्हा यांनी पहिल्या ४० मिनिटांत त्याला येणारे सर्व प्रश्नाची उत्तरे लिहिली. आणि अतिरिक्त पुरवणी मागण्यासाठी पर्यवेक्षकाकडे गेला असता त्याला पर्यवेक्षकाने सांगितले की, अतिरिक्त पुरवणी देण्याची कोणतीही सूचना आम्हाला नाही. त्यावर ते निराश होऊन जागेवर येऊन बसले आणि मुख्य उत्तरपत्रिकेवरील सूचनेमध्ये त्याला एक सूचना दिसली अशी की, सर्व पुरवण्या क्रमाने बांधा. त्याने ती सूचना लगेच पर्यवेक्षकाला दाखवली आणि पुरवण्या मागवायला सांगितल्या. पण या सगळ्यात त्यांचा वेळ वाया गेला आणि ते नाराज झाले.
अग्रवाल मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी अँड टी लॅब्समध्ये त्यांनी २०११ पर्यंत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले आणि नंतर ट्विटरमध्ये सामील झाले. आणि लिंक्डइन नेटवर्किंग साइटवरील त्याच्या प्रोफाइलनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये त्याची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदावर नियुक्ती झाली.
पराग हे ट्विटरचे बहुप्रतिष्ठित पण वादग्रस्त संस्थापक डॉर्सी यांची पहिली पसंती होती. कारण त्यांना याची खात्री होती की, आपली कंपनी आणि कंपनीच्या गरजांची पराग यांना सखोल माहिती आहे. पराग आणि त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसे माहिती नाही, ते मुंबईतील अणुऊर्जा सेंट्रल स्कूलमधून उत्तीर्ण झाले. IIT-B मधून पदवी घेऊन स्टॅनफोर्डला रवाना झाले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांची आई शाळेत शिक्षिका होती आणि वडील अणुऊर्जा विभागात होते. त्यांचे लग्न विनीता अग्रवाला यांच्याशी झाले आहे, त्या एक व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार आहेत. चिकित्सक आणि सहायक क्लिनिकल प्रोफेसर आहेत.
हे ही वाचा:
83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या
‘हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे; याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही’
मेस्सीचा सातवा हा प्रताप! बॅलन डी ओर पुरस्काराने पुन्हा सन्मान
न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बायोफिजिक्समध्ये पदवी प्राप्त करून त्यानंतर हार्वर्ड मेडिकल स्कूलएमआयटीमधून एमडी आणि पीएचडी पदव्या मिळवून, यांच्याकडे अव्वल दर्जाची प्रमाणपत्रे आहेत. ती सध्या अँड्रीसेन हॉरोविट्झ येथे एक सामान्य भागीदार आहे, जिथे ती फर्मच्या बायो फंडासाठी उपचार, निदान आणि डिजिटल आरोग्यासाठी गुंतवणूकीचे नेतृत्व करते. या जोडप्याला अंश नावाचा एक तरुण मुलगा आहे, ज्याचे ट्विटर हँडल देखील आहे.
ट्विटर वर शीर्ष स्थानावर नाव मिळाल्यावर अग्रवाल यांनी आवर्जून त्यांचे मित्र व तसेच मार्गदर्शक जॅक डोर्सी यांचे आभार मानले आहेत.