अबब !! आदिवासी महिलांनी साकारले जगातले सर्वात मोठे चित्र

अवघ्या सहा तासांत केली कमाल

अबब !! आदिवासी महिलांनी साकारले जगातले सर्वात मोठे चित्र

जी -२० च्या परिषदेनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने आयोजित उपक्रमांत, पालघर येथील सहा महिला वारली चित्रकारांनी औरंगाबाद इथे सर्वात मोठे चित्र काढून एक नवा विक्रम साकारला आहे.

पालघरच्या या आदिवासी महिलांनी औरंगाबादच्या १२० स्थानिक मुलींच्या माध्यमातून हे जगातले सर्वात मोठे चित्र साकारले आहे. या वारली चित्रांच्या माध्यमातून महिलेच्या जन्मापासून तिच्या मृत्यूपर्यंत जी विविध पारंपरिक कामे आहेत ती दाखवण्यात आली आहेत.

जी २० या परिषदेनिमित्त आयोजित या उपक्रमातील या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे ४५६ फूट लांब आणि सात फूट रुंद अशा ३२०० चौरस मीटरच्या अशा भिंतीवर हे चित्र साकारले आहे.

जी -२०  या परिषदेचा मान औरंगाबादला मिळाल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने हे चित्र साकारायचे ठरवले. त्यासाठी पालघरच्या ‘द धवलेरी ग्रुप’ च्या या सहा महिलांना औरंगाबाद येथे बोलावण्यात आले.होते आणखी १२० महिलांच्या सहभागातून हे चित्र अवघ्या सहा तासांत साकारले. आणि त्यांनी विश्वविक्रम साध्य केला. त्यामुळे सगळीकडे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्या सुपारी आरोपाची गंभीर दाखल, मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

मतांसाठी जितेंद्र आव्हाडांचे मुस्लिमांसमोर लोटांगण

‘देव्हाऱ्यात पूजेसाठी असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनीच दिला होता…’

“शिंदे गट’ नाही आता “शिवसेना” म्हणा..

कोंण कोणती आहेत चित्रे?

कीर्ती वरठा ,तारा बोंबाडे, राजश्री भोईर, पूनम कोल, शालिनी कासट, तनया उराडे अशी या सहा विश्वविक्रम करणाऱ्या महिलांची नावे असून त्यांनी . बाळाच्या जन्माच्या वेळची सुईण महिला, लग्नाला असणारी सुवासिनी महिला, आणि धवलेरी महिला यांची चित्रे रेखाटली आहेत. ‘धवलेरी’ महिला म्हणजे जिच्या हातून आमच्या समाजात मुलींची लग्न लावली  जातात.  याशिवाय या चित्रांमध्ये महिलांचे असणारे महत्वाचे स्थान सुद्धा दर्शवले आहे. आणखी महत्वाचे म्हणजे आदिवासी समाज आणि निसर्ग हे खूप एकरूप आहेत, त्यांचे आणि निसर्गाचे अनोखे नाते आहे ते पण या चित्रात साकारले आहे.

याशिवाय वारली नृत्य, त्यांचे सण , जंगल, पाणी , जमीन यांचा असलेला आणि संवाद दाखवण्यात आला आहे. आदिवासींची वारली चित्रकला हि फक्त एक लिपी नसून निसर्गाशी आमचे असलेले अतूट नाते दिसून येते. सामान्य माणसाने आदिवासींसारखे जगणे स्वीकारले तर आज जो सगळ्यांना पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आहे तो धोका कमी होऊ शकतो असाच संदेश या चित्राच्या माध्यमातून आदिवासी समाज देत आहेत.

Exit mobile version