“पाकिस्तानचा काश्मीरशी एकमेव संबंध म्हणजे बेकायदेशीरपणे व्यापलेला प्रदेश रिकामा करणे”

भारताने पाकला सुनावले

“पाकिस्तानचा काश्मीरशी एकमेव संबंध म्हणजे बेकायदेशीरपणे व्यापलेला प्रदेश रिकामा करणे”

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरविषयी कळवळा व्यक्त केल्यानंतर भारताने पाकिस्तानला रोखठोक उत्तर दिले आहे. काश्मीर हा इस्लामाबादच्या कंठाचा भाग असल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या भाषणातून केला होता. त्यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचा काश्मीरशी एकमेव संबंध म्हणजे बेकायदेशीरपणे व्यापलेला प्रदेश रिकामा करणे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोणतीही परदेशी गोष्ट कंठातील भाग कशी असू शकते? हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानशी त्याचा एकमेव संबंध म्हणजे त्या देशाने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशाची सुटका करणे,” असे सडेतोड उत्तर परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्वि-राष्ट्र सिद्धांताचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत यावर भर दिला आहे. बुधवारी इस्लामाबादमधील ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भाषण देताना, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांमध्ये राष्ट्र कसे जन्माला आले हे सांगण्याचे आवाहन केले.

मुनीर यावेळी म्हणाले की, “आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्या परंपरा वेगळ्या आहेत. आपले विचार वेगळे आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. हा द्वि-राष्ट्र सिद्धांताचा पाया होता. आपण एक नाही तर दोन राष्ट्रे आहोत या श्रद्धेवर तो रचला गेला होता,” असे जनरल मुनीर म्हणाले.

हे ही वाचा..

खाजगी आयुष्यावरील अफवा मानसिक आरोग्यावर परिणाम करतात

‘नॅशनल हेराल्ड’ : आर्थिक गैरव्यवहारावर सरदार पटेल यांनीही नेहरूंना दिली होती चेतावणी…

नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे दरोडा, सोनिया गांधी, राहुल गांधी आधुनिक दरोडेखोर”

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला !

लष्करप्रमुखांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानच्या मागील पिढ्यांनी देश निर्माण करण्यासाठी अविरत संघर्ष केला आहे. पूर्वजांनी अपार त्याग केला आहे आणि त्याचे रक्षण कसे करायचे हे आपल्याला माहिती आहे, असे ते म्हणाले. पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही, असं जनरल मुनीर म्हणाले.

बुद्धिबळाचा डाव सजलाय, राणीला अखेरची मात मिळेल काय? | Dinesh Kanji | National Herald | Sonia Gandhi

Exit mobile version