पाकिस्तानने गुरुवारी क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. मात्र पाकिस्तानची ही चाचणी अयशस्वी ठरली आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, पाकिस्तानमधील सिंधमध्ये जामशोरो येथील रहिवाशांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एक अज्ञात वस्तू आकाशात पडताना पहिली. ही वस्तू रॉकेट किंवा क्षेपणास्त्रासारखीच होती, जी त्याच्या प्रक्षेपण मार्गाच्या मध्यभागी राहिली होती.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधमधील जमशोरो भागात काल दुपारी १२ च्या सुमारास रहिवाश्यांनी एक अनोळखी वस्तू आकाशातून पडताना दिसली. पाकिस्तानच्या सिंधमधील टेस्टिंग रेंजवरून मिसाइल डागण्यात आले होते. क्षेपणास्त्र लाँच केल्यानंतर काही वेळातच अनियंत्रित झाले आणि सिंध प्रांतातील एका भागात पडले. काही पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सनी या घटनेची माहिती दिली असली तरी, स्थानिक प्रशासनाने मात्र मिसाइलची चाचणी अयशस्वी झाल्याचे वृत्त फेटाळण्यात आलं आहे.
भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अलीकडेच पाकिस्तानमध्ये कोसळले होते. या क्षेपणास्त्र अपघातामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरली होती. भारताकडून चुकून डागलेल्या क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची चाचणी केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पाकिस्तानी क्षेपणास्त्र त्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले आणि लाँच पॅडपासून जवळच कोसळले.
हे ही वाचा:
नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री
काश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
९ मार्च रोजी भारताचे एक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या आत १२४ किमी अंतरावर पडले होते. क्षेपणास्त्र पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, फक्त एका गोदामाचे नुकसान झाले होते. हे क्षेपणास्त्र नियमित देखभालीदरम्यान चुकून डागण्यात आले असे भारताने पूर्ण स्पष्टीकरण दिले होते.