31 C
Mumbai
Wednesday, October 16, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अंधार कोठडीत रवानगी?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अंधार कोठडीत रवानगी?

इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचा आरोप

Google News Follow

Related

पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. तिने दावा केला आहे की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रवानगी कारागृहातील अंधार कोठडीत करण्‍यात आली आहे. त्‍यांना आठवड्यातून एकदा आपल्‍या मुलांशी बोलण्‍याची परवानगीही नाकारण्‍यात आली आहे, असा दावा त्यांच्या पूर्वाश्रमीच्‍या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी केला आहे. दरम्‍यान, पाकिस्‍तानमध्‍ये शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक सुरू असताना त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चांना उधाण आले आहे.

इम्रान खान यांच्‍या पूर्वाश्रमीच्‍या पत्नी यांनी सोशल मीडियावर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, आम्‍हाला माहिती मिळाली आहे की, इम्रान यांना एका अंधाऱ्या कोठडीत एकटे ठेवले आहे. तेथे वीज नाही. त्‍यांना आता आपल्या मुलांना आठवड्यातून एकदा फोनवर बोलण्‍याचीही परवानगी नाही. न्‍यायालयाची परवानगी असतानाही त्यांचा लंडनमधील मुले सुलेमान आणि कासिम खान यांच्याशी फोनवर सुरु असणारा संवाद तोडण्यात आला होता. तसेच अंधार कोठडीत बाहेर जाण्‍याचीही इम्रान खान यांना परवानगी नाही. इम्रानचा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, त्याच्या वकिलांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे.

हे ही वाचा:

लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू

बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई

मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत

मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’

विविध घोटाळ्यातील संशयित आरोपी असणारे इम्रान खान यांना ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये त्‍यांना अटक झाली होती. सध्‍या ते रावळपिंडीमधील आदिलाला कारागृहात आहेत. सध्‍या पाकिस्‍तानमध्‍ये शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी निदर्शने करणार्‍या इम्रान खान यांच्‍या शेकडो समर्थकांनाही अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांनी इम्रान खान यांच्‍या सुटकेच्‍या मागणीसाठी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्‍तानमध्‍ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पाकिस्‍तानमध्‍ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक सुरु आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सदस्य देशांमधील प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्‍थित आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा