‘पाकिस्तानच्या नशिबी चपातीचा तुकडाही नाही, पंतप्रधान चीनकडे भीक मागत आहेत’

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा घरचा आहेर

‘पाकिस्तानच्या नशिबी चपातीचा तुकडाही नाही, पंतप्रधान चीनकडे भीक मागत आहेत’

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर पहिल्यांदाच नवाझ शरीफ यांनीही भारताचे जाहीरपणे कौतुक केले आहे. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना जी-२० परिषद आणि चांद्रयान-३ मोहिमेचे कौतुक केले. तसेच, जे आपल्याला (पाकिस्तान) करायला हवे होते, ते भारताने करून दाखवले, असेही ते म्हणाले.

‘आपले पंतप्रधान परदेशांत भीक मागत फिरत आहेत. जगभरातील देशांच्या नजरेत भारत आणि पाकिस्तानची किंमत काय आहे? पाकिस्तानमध्ये लोकांना चपातीचा एक तुकडा मिळवणेही मुश्कील झाले आहे,’ अशी टीका शरीफ यांनी केली. नवाझ शरीफ यांनी एका व्हिडीओ लिंकद्वारे लंडनमधून लाहोरमध्ये पक्षाच्या बैठकीला संबोधित करून स्वत:च्या देशावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीचा लेखाजोखा मांडला.

‘हे कोण लोक आहेत, ज्यांनी पाकिस्तानचे असे हाल करून ठेवले आहेत. हे कोण लोक आहेत, ज्यांनी देशाला इथवर आणून ठेवले आहे. आज गरीब एका चपातीसाठी आसूसलेला आहे. मी एक व्हिडीओ पाहिला. त्यात एक माणूस आठ-आठ चपात्यांचे एक पाकीट वाटत होता. त्या चपात्या घेण्यासाठी १००हून अधिक माणसांची रांग लागली होती. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. आज सर्वसाधारण माणूस चपातीही घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. ही परिस्थिती कोणी आणली?, असा प्रश्न नवाझ शरीफ विचारत आहेत.

हे ही वाचा:

गणपतीला जाणाऱ्या गाडीला समृद्धीवर अपघात, १ मृत्युमुखी

तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

‘ही परिस्थिती कोणी आणली, त्यांना आपण पुरेपूर ओळखतो. मात्र त्यांना शिक्षा देण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम आहे का? माझा आणि तुमचा एका मिनिटात हिशोब केला जातो. मी देशाच्या भल्यासाठी काम करूनही मला ११-११ वर्षे देशापासून लांब राहण्यास भाग पाडले गेले. न्यायालय नवाझ शरीफला २७ वर्षांची शिक्षा ठोठावते. कारण काय तर त्याने पाकिस्तानला आणखी सक्षम बनवले. तुम्ही हे बक्षीस आम्हाला देता का? चार न्यायाधीश बसतात आणि कोट्यवधी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांची हकालपट्टी करतात. यामागे जनरल बाजवा आणि जनरल फैज यांचा हात आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version