युट्युब चॅनेल्सच्या बंदीनंतर पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे एक्स अकाउंट ब्लॉक

पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

युट्युब चॅनेल्सच्या बंदीनंतर पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे एक्स अकाउंट ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची विविध स्तरावर कोंडी करण्याचे काम सुरू आहे. सोमवारी गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर सरकारने युट्युब चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंगळवार, २९ एप्रिल रोजी भारत सरकारने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहे. युट्युब चॅनेलवरील कारवाईनंतर भारताकडून तातडीने हे पाउल उचलण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. सोमवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, त्याच्या सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भारताने १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेलवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. एकत्रितपणे, या चॅनेलचे ६३ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. गेल्या आठवड्यात, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये पाकिस्तान दहशतवादी गटांना निधी आणि पाठिंबा देत असल्याचे सांगून मोठी कबुली दिली होती.

भारताने डॉन न्यूज, इर्शाद भाटी, साम टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, सम स्पोर्ट्स, जीएनएन, उझैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराझी, मुनीब फारूक, सुनो न्यूज आणि राझी नामा हे यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. तर, परराष्ट्र मंत्रालय बीबीसीच्या रिपोर्टिंगवर लक्ष ठेवणार असून त्यांनी बातमीत दहशतवादी असा उल्लेख न करता ‘मिलीटंट’ असा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला होता.

हे ही वाचा..

काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टवरून भाजपाने सुनावले; ‘सर तन से जुदा’ प्रतिमेचा वापर केल्याचा आरोप

‘ज्ञान पोस्ट’च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार शिक्षण

जम्मू-काश्मीर : बारामुल्लामधील भीषण आगीत दोन घरे खाक

पिवळ्या टॉपमध्ये मोनालिसाने केले फोटोशूट, काय म्हणाले चाहते ?

दरम्यान, सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालयाच्या ‘व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम असोसिएशन नेटवर्क’च्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिला तेव्हा संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी, राजदूत योगना पटेल यांनी पाकिस्तानला सुनावले. त्यांनी म्हटले की, एका विशिष्ट प्रतिनिधी मंडळाने भारताविरुद्ध निराधार आरोप करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करणे आणि त्यात कमकुवतपणा आणणे हे दुर्दैवी आहे. एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल केल्याचे संपूर्ण जगाने ऐकले आहे. या उघड कबुलीजबाबाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही आणि पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक देश म्हणून उघड झाला आहे. जग आता डोळेझाक करू शकत नाही.

Exit mobile version