काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर या भागात सुरु झालेली विकासाची गंगा पाकिस्तानच्या डोळ्यात अजूनही खुपत आहे. याचे प्रत्यंतर अमेरिकेतील प्रेस क्लब आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजतर्फे वॉशिग्टनमध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रात याचे पुन्हा प्रत्यंतर आले आहे.
या परिषदेमध्ये काश्मीरच्या परिवर्तनावर चर्चा आयोजित करण्यात आली होती . जम्मू काश्मीर मध्ये होत असलेले बदल आणि विकास याबद्दल झालेल्या सकारत्मक बदलांवरील चर्चा उपस्थित काही पाकिस्तान अधिकाऱ्यांना पटली नाही. त्यांनी परिषदेत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांना समजावून सांगितले तरी काही फरक पडला नाही. अखेर गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानींना आयोजकांनी धक्के मारून बाहेर काढले.
इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील प्रेस क्लबमध्ये काश्मीरच्या परिवर्तनावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद आणि जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला नगरपरिषदेचे अध्यक्ष तौसीफ रैना हेही उपस्थित होते. या दोघांनीही आपल्या भाषणात काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून होत असलेल्या विकासकामांचे आणि चांगल्या बदलांचे कौतुक केले. तिथे उपस्थित पाकिस्तानी लोकांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी गोंधळ सुरू केला.
मीर बोलत असताना काही पाकिस्तानी उभे राहिले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर आयोजकांनी त्यांना धक्के देऊन बाहेर काढले. या पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना या दोन्ही वक्त्यांनी जोरदार उत्तर दिले. आज सर्व प्रेक्षकांनी तुमचा खरा चेहरा बघितला आहे. आपण काश्मीरमध्ये बघितले, आज आपण वॉशिंग्टनमध्ये बघितले आहे आणि आज तर सर्व जगणे बघितले कि हे लोक किती क्रूर आहेत ते. काश्मीरच्या ऱ्हासासाठी तुम्हीच (पाकिस्तानी) कारणीभूत आहेत. हे तेच लोक आहेत जे काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. देव तुम्हाला सुबुद्धी देवो असे या वक्त्यांनी त्यांना सुनावले.
हे ही वाचा:
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई
‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’
जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’
पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?
त्यांना हिंसाचाराची आग पेटवत ठेवायची आहे
मीर जुनैद म्हणाले की, काश्मीरचा पुनर्जन्म शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा देश म्हणून झाला आहे. जम्मू आणि काश्मीरने अनेक बदल पाहिले आहेत, ज्याने त्याला विरोधाच्या स्थितीतून पुरोगामी केंद्रशासित प्रदेशात नेले आहे. पाकिस्तानवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, जे देश जागतिक व्यासपीठावर जगाला मूर्ख बनवण्याचे ढोल वाजवत आहेत त्यांना काश्मीरच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीशी काहीही देणेघेणे नाही.काश्मीर ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची समस्या आहे हे सत्य स्वीकारा आणि म्हणूनच त्यांना काश्मीरमध्ये हिंसाचाराची आग पेटवत ठेवायची आहे असा जोरदार घणाघात जुनैद यांनी केला