“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

पूजा गेहलोत हिने कुस्ती या खेळात कांस्यपदक पटकावले. मात्र, सुवर्णपदक मिळवण्याची संधी हुकल्याने तिने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे कौतुक करत तिला प्रोत्साहन दिले होते.

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे सुरू असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू असून काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू पूजा गेहलोत हिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. मात्र, सुवर्णपदक न मिळवता आल्यामुळे तिने देशाची माफी मागितली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाचे कौतुक करत तिला प्रोत्साहन दिले. यावरून पाकिस्तानमधील पत्रकार शिराझ हसन यांनी पाकिस्तानच्या सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

शिराझ हसन यांनी लिहिलं आहे की, “पूजा गेहलोतने हिने स्पर्धेत कांस्यपदक जिंकले पण देशाला सुवर्णपदक जिंकून देऊ न शकल्यामुळे दु:ख व्यक्त केले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला उत्तर दिले. पाकिस्तानच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा असा संदेश तुम्ही कधी पाहिला आहे का? पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे तरी त्यांना माहित आहे का?”, असा सवाल हसन यांनी केला आहे.

हे ही वाचा:

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो गटात पूजाने कांस्यपदक पटकावले. मात्र, सुवर्णपदक मिळवण्याची संधी हुकल्याने तिने पदक जिंकल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली होती. “उपांत्य फेरीत हरल्यामुळे खूप दुःख झालं. यासाठी मी देशाची माफी मागते,” असं ती म्हणाली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत तिचे कौतुक केले होते. “पूजा, तुझे पदक आनंद साजरा करण्याचे असून त्यासाठी माफी मागायची नाही. तुमचा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो, तुमचे यश आम्हाला आनंदित करते,” असे प्रोत्साहन देणारे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.

Exit mobile version