भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना

पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांचे मत

भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना

भारतात लोकसभा निवडणुकीचा उत्साह पार पडत असून यासाठी प्रचार सभांना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकांकडे इतर देशांचेही लक्ष असून पाकिस्तानचेही भारतातील निवडणुकांकडे लक्ष आहे. काही नेत्यांनी भारतातील निवडणुकांबद्दल आणि काँग्रेसच्या पाठींब्याबद्दल भाष्यही केले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीचं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने भारतीय नेत्यांना भारतातील निवडणुकांदरम्यान राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानला त्यात ओढू नका, असे आवाहन केले होते. परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, “भारतीय नेत्यांनी निवडणुकीच्या कारणास्तव पाकिस्तानला भारताच्या भाषणात ओढण्याची त्यांची प्रवृत्ती थांबवावी.” याच्या काही दिवसांनंतरचं बुधवार, १ मे रोजी पाकिस्तानी नेते आणि इम्रान खानचे निकटवर्ती फवाद चौधरी यांनी ‘एक्स’ वर काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यावर लिहिले आहे की, राहुल इज ऑन फायर. यावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. अमित मालवीय, शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल यांचा पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्याचा मानस असल्याचे दिसते.

पुढे ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ शी बोलताना पाकिस्तानी नेते फवाद चौधरी म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरिबांच्या हक्कांबद्दल बोलले आहेत. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. यापेक्षा भारतीय राजकारण कोणीही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत नाही म्हणून त्यांना पाठिंबा दिला. गरीब माणूस भारतीय राजकारणातून केव्हाच निघून गेला आहे, उद्योगपतींचा भारत झाला आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”

“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”

दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?

अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद

पुढे ते असेही म्हणाले की, “आम्ही भारतीय राजकारणात ढवळाढवळ करत नाही, फक्त योग्य गोष्टीला पाठिंबा देत आहोत. भारतात भाजपचे सरकार येऊ नये, मोदींना रोखणे गरजेचे आहे, बाकी कोणीही येईल, आम्ही त्याला साथ देऊ. राहुल पाकिस्तानशी शांततेची चर्चा करतात, लोकांनी त्यांना मतदान करावे. भारतात हिंदू कट्टरतावादाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे मुस्लिम कट्टरपंथी जन्माला आले आहेत. हे नेतृत्व द्वेषाचे राजकारण करते, त्यामुळे मोदींच्या विचारसरणीला घाबरायला हवे. राहुल गांधींना पाकिस्तानसोबत शांतता हवी असेल तर काय चुकले, लोकांनी त्यांना साथ द्यावी,” असं फवाद चौधरी म्हणाले.

Exit mobile version