पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला

पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला

पाकिस्तानी पत्रकार इकरार उल हसन याच्यावर पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यत आला आहे. पाकिस्तानच्या इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात आयबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इकरार जखमी झाला असून त्याच्या डोक्यातून रक्त येण्यापर्यंत मारहाण करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या एका सरकारी इमारतीच्या आवारात पत्रकार इकरार हसन हा आपल्या कार्यक्रमाचे शुटिंग करत होता. त्याचा ‘सरे आम’ (Sar-e-aam) हा कार्यक्रम पाकिस्तानी टिव्ही जगतात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पण या कार्यक्रमाच्या शुटींग दरम्यानच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्या आधी त्यांचा छळ करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे. पाकिस्तानी आयबी अधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणात एकूण पाच जणांना निलंबीत करण्यात आले आहे. हा पत्रकार अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

या हल्ल्यात इकरार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने अब्बासी शहीद रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी अवस्थेतील इकरारचे फोटो सोशल मिडीयावर वाऱ्यासारखे पसरले आणि ही संपूर्ण घटना प्रकाश झोतात आली. पण सुरवातीला या प्रकरणात कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती.

या संपूर्ण विषयात स्वतः पिडीत पत्रकार इकरार किंवा त्याच्या वाहिनीने कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही त्वरेने कोणती कारवाई किंवा अटक केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तानमधील पत्रकार संघटनांकडून आणि सामान्य जनतेकडून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे.

Exit mobile version