पाकिस्तानची ‘सीमा’ अखेर गेली भारताच्या तुरुंगात

भारतीय व्यक्तीशी लग्न करण्याचा होता इरादा पण पोलिसांकडून अटक

पाकिस्तानची ‘सीमा’ अखेर गेली भारताच्या तुरुंगात

वैध व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि तिचा ग्रेटर नोएडा येथील प्रियकर सचिन सिंग यांच्या प्रेमकहाणीचा शेवट अखेर तुरुंगात झाला. या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.

या जोडप्याने लग्न करण्याची परवानगी मागितली होती. मात्र हैदर (२७) या महिलेवर विदेशी कायदा आणि पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत देशात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सचिन आणि त्यांचे वडील नेत्रपाल (४८ ) यांच्यावरही पाकिस्तानी महिलेला सीमा ओलांडून भारतात येण्यास मदत केल्याबद्दल आणि स्वत:च्या घरी तिची व्यवस्था केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांच्या चाचणीचे भवितव्य अधांतरी

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

दोघात तिसरा आला, आता बळ कुणाचे वाढेल?

सीमा हैदर या महिलेने तिच्या चार मुलांसह मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कराची सोडली. त्यानंतर ती दुबईमार्गे नेपाळमधील काठमांडूला गेली. हे पाच जण नेपाळमधील पोखरा येथून बसमधून बेकायदा भारतात आले. गेल्या आठवड्यात सचिन आणि हैदरने लग्नासाठी मदत करावी, या हेतूने शहरातील वकिलाशी संपर्क साधला. या वकिलाकडून पोलिसांना तिच्याबाबत समजले. सोमवारी ते बसमधून वल्लभगडला जात असताना ती बस अडवून त्यांना पकडण्यात आले.

मंगळवारी ताब्यात घेण्यापूर्वी सीमा आणि सचिन यांनी पोलिस आणि भारत सरकारला त्यांना लग्न करू देण्याची विनंती केली. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लग्नासाठी मदत करण्याची विनंती करत आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला सीमा आवडते. पोलिसांनी मला अटक केली कारण ती पाकिस्तानी आहे, ’ असे सचिनने ग्रेटर नोएडा येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात सांगितले.

सीमानेही ती कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे, परंतु तिने काहीही चुकीचे केले नाही, असे ठासून सांगितले. ‘मी इथे मरायला तयार आहे. मी कधीच पाकिस्तानला परतणार नाही… तिथे माझे कोणीही नाही. माझे सचिनवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे,’ असे ती म्हणाली.

Exit mobile version