पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानने हात वर केले असून आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या भारतविरोधी कुरघोड्या सुरूचं आहेत. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होत असतानाचा पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने उपपंतप्रधानांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
दानिश कनेरिया याने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “जेव्हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान दहशतवाद्यांना “स्वातंत्र्यसैनिक” म्हणतात, तेव्हा ते केवळ अपमानास्पद नाही, तर ही राज्यपुरस्कृत दहशतवादाची उघड कबुली आहे,” असे परखड मत कनेरिया याने मांडले आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना, पाकिस्तानचे उपपंतप्रधान दार म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी हल्ला करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात.” भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर हे विधान त्यांच्याकडून आले आहे. यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
When the Deputy Prime Minister of Pakistan calls terrorists “freedom fighters,” it’s not just a disgrace — it’s an open admission of state-sponsored terrorism. pic.twitter.com/QlS1UDzq20
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 24, 2025
हे ही वाचा:
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले
पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं; नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी
यापूर्वी पहलगाम हल्ल्यावरून दानिश याने पाकिस्तान सरकारवरही निशाणा साधला होता. दानिश कानेरिया याने दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करत ट्वीटवरून पाकिस्तान सरकारला सुनावले होते. त्याने ट्वीट करत म्हटले की, “जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच काही सहभाग नसेल, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप हल्ल्याचा निषेध का केला नाही? तुमचे सैन्य अचानक हाय अलर्टवर का आहे? कारण खोलवर, तुम्हाला सत्य माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्यांचे पालनपोषण करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असे ट्वीट करत दानिश याने पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला.