एकीकडे भारत यशाची नवी उंची गाठत असताना दुसरीकडे पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. भारताची घौडदौड ही विकसित राष्ट्र होण्याकडे सुरु आहे तर पाकिस्तानाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अशातच आता पाकिस्तानचे नागरिक भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसलेला पाहायला मिळत आहे. यासंदर्भाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे लोकार्पण केले. या यशानंतर जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. या पाण्याखालच्या मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांनीही हे व्हिडीओ पाहिले आहेत. यानंतर पाण्याखालील मेट्रोवर पाकिस्तानी नागरिकांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अंडरवॉटर मेट्रोचा व्हिडिओ घेऊन एक पाकिस्तानी वृत्तनिवेदक सर्वसामान्यांना काही प्रश्न विचारत आहे. लोकांना व्हिडिओ दाखवताच ही अंडरवॉटर मेट्रो कोणत्या देशाची आहे असं त्यांना विचारण्यात आले. तेव्हा पाकिस्तानी नागरिकांनी उत्तर म्हणून अमेरिका, जपान आणि चीनसारख्या देशांची नावे घेतली. पण, यापैकी कोणत्याही देशाची ही मेट्रो नसून आपल्या शेजारी असलेल्या भारताची ही अंडरवॉटर मेट्रो आहे हे त्यांना सांगताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता
राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले
दिल्लीत रस्त्यावर नमाज, आता हिंदू संघटनांकडून हनुमानचालिसा!
भारताच्या प्रगतीचे नागरिकांनी कौतुक करत पाकिस्तान मधील परिस्थितीवर टीकाही केली आहे. एखाद्या गोष्टीचे फायदे आणि तोटे पाहूनच भारतात निर्णय घेतले जातात. पाकिस्तानमध्ये रेल्वे क्षेत्रात एकच पाऊल उचललं गेलं आणि ते म्हणजे ऑरेंज लाईन पण ते ही तोट्यात आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानी असल्याची लाज वाटत असल्याचेही एक जण म्हणत आहे. पाकिस्तानने अशीच मेहनत घेतली असती तर आज पाकिस्तानचे कौतुक झाले असते. पण, भारताने मेहनत घेतली आणि आज त्यांचे कौतुक होत आहे, अशा भावना लोकांच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम आहे. ते स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या कामाला लागतात आणि इतरांनाही ते करायला लावतात. जिथे विचार संपतात तिथून ते कामाला सुरुवात करतात, अशा शब्दात एका पाकिस्तानी तरुणीने नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
भारतातील मेट्रे पाहून पाकिस्तानी नागरीक म्हणाले, हा तर जापान किंवा अमेरिका…भारत म्हटल्यावर म्हणाले मोदींना सॅल्यूट#Metro #NarendraModi @Pakishtan pic.twitter.com/NWLGkjSz0Q
— jitendra (@jitendrazavar) March 13, 2024