24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध 'बंड'

पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’

Google News Follow

Related

पाकिस्तानच्या सर्बियन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक संदेश पोस्ट केला आहे. ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना विचारले आहे की सरकारी अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसताना सरकार किती काळ गप्प राहण्याची अपेक्षा करत आहे.

इम्रान खान यांना त्यांच्या सरकारी अधिकार्‍यांकडून ‘बंडाचा’ सामना करावा लागत असल्याच्या संदेशाने ट्विटरवर खळबळ उडाली आहे. डिजिटल मीडियावर इम्रान खानचे खास व्यक्ती, डॉ. अर्सलान खालिद यांनी ट्विट केले की परराष्ट्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खाते हॅक केले गेले आहे.

हा व्हिडिओ असलेले ते ट्विट दीड तासानंतर डिलीट करण्यात आले. पाकिस्तानच्या सर्बियन दूतावासाचे ट्विटर खाते हे ‘ब्लू टिक’ असलेले हँडल आहे आणि त्याचे १,५५३ फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ आणि संदेश पोस्ट केल्याच्या काही मिनिटांतच व्हायरल झाला कारण पगार न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करण्याव्यतिरिक्त, पोस्टमध्ये इम्रान खानवर जोरदार टीका करणारा हा व्हिडिओ होता.

“महागाईने मागील सर्व विक्रम मोडीत काढत असताना, इम्रान खान आपण आमच्याकडून किती काळ अपेक्षा करता की आम्ही सरकारी अधिकारी गप्प बसू आणि गेल्या ३ महिन्यांपासून पगार न देता तुमच्यासाठी काम करत राहू? आम्ही फी न भरल्यामुळे आमच्या मुलांना शाळेतून बाहेर काढण्यात आले आहे. हाच तुमचा “नया पाकिस्तान” आहे का?” असं ट्विटमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मला माफ करा इम्रान खान, माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही.”

हे ही वाचा:

ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?

‘आप ने घबराना नहीं’ या इम्रान खानच्या विधानाची खिल्ली उडवणाऱ्या म्युझिक व्हिडिओसह हे ट्विट आले आहे. “जर साबण महाग झाला तर वापरू नका. जर गहू महाग झाला तर खाऊ नका,” असे गाण्याचे बोल इम्रान खानच्या ‘आपने घबराना नही’ व्हिडिओमध्ये घातले आहेत. हा म्युझिक व्हिडिओ साद अल्वीचा आहे, जो ८ मार्चला रिलीज झाला होता. ‘आप ने घबराना नहीं’ हे या गाण्याचे शीर्षक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा