भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा

भारताच्या चांद्रमोहिमेचे ‘एकदम अद्भूत’ असे वर्णन

भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा

भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान- ३ च्या यशानंतर पाकिस्तानी टीव्ही अँकरनेही भारताचे भारतासाठी जल्लोष केला. ‘मुझे खुशी हो रही है’ असे म्हणत जिओ न्यूज शोच्या पाकिस्तानी टीव्ही अँकरनी भारताचे कौतुक केले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच पाऊल टाकण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताने चांद्रयान-३च्या माध्यमातून करून दाखवली. देशातील तसेच, जगभरातील वृत्तपत्रांनी भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद घेतली. तसेच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) कामगिरीचे कौतुक केले. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या जिओ न्यूज शोच्या एका भागातही भारताच्या चांद्रमोहिमेच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसमोरील आव्हानांचाही ऊहापोह करण्यात आला.

शोचे अँकर हुमा अमीर शाह आणि अब्दुल्ला सुलतान यांनी दोन्ही देशांच्या आकांक्षा आणि परिस्थितींमधील तीव्र असमानता अधोरेखित केली. ‘इंडिया चांदपे पोहोच गया, हम बीचमेंही फंसे हुए है (भारत चंद्रावर पोहोचला. आपण मध्येच अडकलो आहोत,’ असे हुमा या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

‘आम्हाला आमची क्षितिजे रुंदावण्याची गरज आहे,’ असेही त्यांनी निदर्शनास आणले. भारत आणि पाकिस्तानमधील स्पर्धा अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात झाल्यास त्याचा फायदा अंतराळ संशोधनात होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारताच्या चांद्रमोहिमेचे ‘एकदम अद्भूत’ असे वर्णन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच, भारताच्या या यशाबद्दल दोघांनी खूप आनंद व्यक्त केला. ‘हमें यहाँ बैठके खुशी हो रही थी (आम्हाला येथे बसून आनंद होत होता),’ अशा शब्दांत त्यांनी चांद्रमोहिमेच्या यशाचे कौतुक केले.

हे ही वाचा:

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

धारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले

‘आयएनएस सुनयना’ची दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट

सुशांत सिंगचे घर विकत घेणार अदा शर्मा?

मोहसीन अली नावाच्या क्रिकेट विश्लेषकाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. एका ब्रिटिश पत्रकाराने चांद्रयान-३च्या यशाबद्दल ‘इर्ष्यायुक्त वर्णद्वेषी टिप्पणी केल्यामुळे मोहसिन यांनी त्याच्यावर टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Exit mobile version