पाकिस्तान ‘ग्रे लिस्ट’मध्येच राहणार

पाकिस्तान ‘ग्रे लिस्ट’मध्येच राहणार

पाकिस्तानला ‘वाढीव देखरेख’ किंवा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ‘ग्रे लिस्ट’ अंतर्गतच ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने घेतला आहे. पाकिस्तानने ज्या २७-कलमी कृती आराखड्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते ते न केल्यामुळे पाकिस्तानवर हे निर्बंध कायम ठेवले जात आहेत. असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मधून बाहेर काढण्यासाठी २७ वेगवेगळ्या मापकांवर मोजले जाईल. यापैकी जो शेवटचा घटक आहे, तो म्हणजे ‘दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्याविरोधात पुरेशी कारवाई करणे’, यामध्ये पाकिस्तान संपूर्णपणे नापास झाला आहे.

एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेयर गुरुवारी ही घोषणा करतील. जूनच्या मूल्यांकनात, प्लेयरने म्हटले होते की, “संयुक्त राष्ट्रांघाने घोषित केलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करणे आणि त्यांचे आर्थिक धागेदोरे शोधून त्यांच्यावर कारवाई करणे, हा कळीचा मुद्दा आहे.

मसूद अझहर सारख्या संयुक्त राष्ट्रांघाने घोषित केलेल्या दहशतवाद्यावर पाकिस्तानने अद्याप कारवाई आणि खटला चालवलेला नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) किमान ८ दहशतवादी छावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०२१ पासून ३० दहशतवादी भारतात घुसले आहेत, तर किमान ६०-८० ठार झाले आहेत किंवा रोखले गेले आहेत.

हे ही वाचा:

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

एफएटीएफने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये ठेवण्याची घोषणा केल्यानंतर, मंत्री हम्माद अझहर म्हणाले होते की, पाकिस्तानने २७ पैकी २६ अनुपालन बिंदू लागू केले आहेत, तर शेवटचा मुद्दा लवकरच “३-४ महिन्यांत” लागू केला जाईल.

Exit mobile version