25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियाभारताच्या 'या' कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार

भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार

Google News Follow

Related

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेन नागरिक देश सोडून पळून जात आहेत.भारतानेही आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत आपल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच भारताने इतर देशातील नागरिकांना वसुधैव कुटुंबकम या धोरणानुसार मदत केली आहे. भारताच्या या कामगिरीसाठी भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या पाकिस्तानचे लोकही या कामगिरीचे खुलेपणाने कौतुक करत आहेत. एका पाकिस्तानी विद्यार्थीनीने कीवमधून भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आपल्या नागरिकांना वाचवण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या भारताने आतापर्यंत इतर देशांतील अनेकांना सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली आहे. यामध्येच कीवमध्ये अडकलेल्या पाकिस्तानच्या एका युवतीची भारताने सुखरूप सुटका केली आहे. अस्मा शफीक असे या युवतीचे नाव असून तिने या मदतीसाठी भारताचे आभार मानले आहेत.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक देशातील विद्यार्थी आणि नागरिक अडकले होते. भारताने गंगा ऑपरेशन हा उपक्रम करून आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. त्यामध्येच या पाकिस्तानी युवतीचा समावेश होता. संकटातून बाहेर काढल्यामुळे पाकिस्तानच्या या मुलीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीवमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या मदतीसाठी आभार मानले आहेत. भावनिक वक्तव्य करत तिने भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!

विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!

हजारो पात्र खातेदारांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

भारताने यापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि प्रयत्नांनी असे कार्य केले आहे. भारताच्या या प्रयत्नामुळे अस्माने सुरक्षितपणे कीव सोडले आहे. ती सध्या पश्चिम युक्रेनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ती लवकरच पाकिस्तानात परतणार जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ या धोरणानुसार इतर देशांतील अडकलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा