बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे प्रवाशांसह अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी हे अपहरण करून प्रवाशांना ओलिस ठेवले होते. जवळपास दोन दिवस बचावकार्य पाकिस्तानकडून सुरू होते. माहितीनुसार यात, ३३ बलूच लिबरेशन आर्मीचे अपहरणकर्ते मारले आणि ओलिसांची सुटका करण्यात आली. काही ओलिसांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे साऱ्या जगाचे लक्ष पुन्हा एकदा पाकिस्तानकडे वळले होते. दरम्यान, रेल्वे अपहरणामागील सूत्रधार अफगाणिस्तानात असल्याचा आणि ओलिसांना मुक्त करण्यासाठी सुरक्षा कारवाईदरम्यान हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी सीमेपलीकडून त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला होता. मात्र, तालिबानने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.
बलुचिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या प्रवासी ट्रेनच्या अपहरणात अफगाणिस्तानस्थित अतिरेकी सहभागी असल्याचा पाकिस्तानचा दावा तालिबानने गुरुवारी फेटाळून लावला. “बलुचिस्तान प्रांतातील प्रवासी ट्रेनवरील हल्ल्याचा संबंध अफगाणिस्तानशी जोडणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने केलेल्या निराधार आरोपांना आम्ही स्पष्टपणे नाकारतो आणि पाकिस्तानी बाजूने अशा बेजबाबदार वक्तव्यांऐवजी स्वतःच्या सुरक्षा आणि अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो,” असे खडेबोल अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.
We categorically reject baseless allegations by Pakistani army spokesman linking the attack on a passenger train in Balochistan province with Afghanistan, & urge Pakistani side to focus on resolving their own security & internal problems instead of such irresponsible remarks. pic.twitter.com/CVxWauCS2b
— Abdul Qahar Balkhi (@QaharBalkhi) March 13, 2025
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच लिबरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा सुरू असून यासाठी अनेकदा बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ले सुरू असतात. दरम्यान, बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या अपहरणानंतर सुरू करण्यात आलेले क्लियरन्स ऑपरेशन आता पूर्ण झाल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या ठिकाणी असलेले सर्व ३३ बलूच लिबरेशन आर्मीचे अपहरणकर्ते मारले गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने दिली होती.
हेही वाचा..
डी गुकेशने घेतले तिरुपतीचे दर्शन; केस देवाला अर्पण करत केले मुंडण
स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले
१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला आता हिंदू सण आठवले, आदित्य ठाकरेंचा हा खोटारडेपणा!
मंगळवारी सुमारे ४५० लोकांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीने बॉम्ब आणि बंदुकांनी हल्ला केला. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला जात असताना सिब्बीजवळील बोगद्यात अडवण्यात आली. बलूच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की त्यांच्याकडे २०० हून अधिक ओलिस होते, ज्यात बहुतेक सुरक्षा आणि गुप्तचर कर्मचारी होते.