सीमेपलीकडून भारतात अमली पदार्थांच्या होणाऱ्या तस्करीबाबत मोठी धक्कादायक माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या व्यक्तीने भारतामध्ये अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची कबुली दिली आहे. भारताच्या सीमावर्ती भागात काही दिवसांपासून ड्रोनच्या हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली महत्त्वाची मानली जात आहे.
पाकिस्तानी पत्रकार हमिद मीर यांनी घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान शरीफ यांचे सल्लागार मलिक मोहम्मद अहमद खान यांनी तस्करीचा उल्लेख केला. ही मुलाखत भारताच्या पंजाब सीमेजवळ असलेल्या पाकिस्तानच्या कसूर शहरात झाली. खान हे कसूरचे आमदार आहेत.
हे ही वाचा:
ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप
ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांना सोडणार नाही
विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं
मीर यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत कसूरमध्ये सीमेपलीकडे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर खान यांनी ‘हे भीतीदायक आहे,’ असे उत्तर दिले आहे. ‘हल्लीच येथे दोन घटना घडल्या. ज्यात ड्रोनसोबत १० किलो हेरॉइन लावले होते आणि ते सीमेपलीकडे फेकले गेले. सुरक्षा यंत्रणा हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.
या व्हिडीओखाली मीर यांनी पंतप्रधानांचे सल्लागार मलिक मोहम्मद अहमद खान यांचे ‘मोठी धक्कादायक माहिती’ अशी फोटोळ दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, अमली पदार्थांचे तस्कर पाकिस्तान-भारत सीमेजवळ कसूरमधील पूरग्रस्त परिसरात ड्रोन्सचा वापर करत आहेत. कसूर हा भाग पंजाबच्या खेमकरा आणि फिरोजपूरच्या जवळ वसला आहे. जुलै २०२२ ते जुलै २०२३दरम्यान केवळ फिरोजपूर जिल्ह्यातच एनडीपीएस कायद्यांतर्गत ७९५ गुन्हे दाखल झाले आहेत.