काही दिवसांपूर्वी आखाती देशांनी त्यांच्या देशात पाकिस्तानमधून येणाऱ्या भिकाऱ्यांमुळे समस्या निर्माण होत असल्याची तक्रार दाखल करत पाकिस्तानला सुनावले होते. उमराहच्या नावाखाली पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर सौदी अरेबियाने चिंता व्यक्त केली होती. तसेच सौदी अरेबियाने पाकिस्तानला अशा लोकांना आखाती देशात येण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करण्यास सांगितले होते. जर इस्लामाबाद योग्य कारवाई करण्यात अयशस्वी ठरले तर त्याचा दोन्ही राष्ट्रांमधील धार्मिक आणि परस्पर संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशारा सौदी अधिकाऱ्यांनी दिला होता.
सौदी अरेबियाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे जगभरात नाक कापले गेले होते. यानंतर पाकिस्तानी सरकारने त्यांच्या देशातील ४,३०० भिकाऱ्यांना एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये (ईसीएल) टाकलं आहे. म्हणजेच त्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं आहे. जेणेकरून हे भिकारी देशाबाहेर जाऊ नयेत.
सौदी हज मंत्रालयाने पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला इशारा दिला होता आणि सांगितले होते की, उमराह व्हिसाखाली पाकिस्तानी भिकाऱ्यांना आखाती देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करा. हज आणि उमराह व्हिसाचा दुरुपयोग करून हे भिकारी मक्का आणि मदीना या शहरांमध्ये भीक मागायला जातात. तिकडेच कायमचं वास्तव्य करतात.
हे ही वाचा :
वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’
दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!
रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस
‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते!
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन रझा नख्वी यांनी बुधवारी सौदी अरबचे मंत्री नासेर बिन अब्दुलअजीज अल दाऊद यांना भिकारी निर्यात करणाऱ्या टोळ्या आणि माफियांविरोधात पाकिस्तानने उचललेल्या पावलांची माहिती दिली. दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, परदेशात अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानातून येत असल्याचे समोर आलं होतं. सौदी अरब आणि इराक या दोन देशांनी पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांमुळे चिंता व्यक्त केल्यामुळे ही समस्या अधिक ठळक झाली होती.