इंटरनेट, डिजिटल क्षेत्रात आशियामध्ये पाकिस्तानने तळ गाठला!

सायबर गुन्ह्यातही गेल्या पाच वर्षात पाकिस्तानात भरमसाठ वाढ

इंटरनेट, डिजिटल क्षेत्रात आशियामध्ये पाकिस्तानने तळ गाठला!

पाकिस्तानचे आपल्या कामगिरीमुळे पुन्हा जगभरात हसे झाले आहे. आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या पाकिस्तानची २०२२मध्ये इंटरनेटचा विस्तार आणि डिजिटल शासन प्रणालीमध्ये सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये नोंद झाली आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘पाकिस्तानचे इंटरनेट लँडस्केप २०२२’ या शीर्षकाचा अहवाल ‘बाइट्स फॉर ऑल’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात हे नमूद करण्यात आले आहे. ही मानवी हक्क आणि समर्थन संस्था आहे. या संस्थेने पाकिस्तानमधील मानवी हक्क व माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान यांच्यातील संबंधांचा तपशीलवार शोध घेतला आहे.

या अहवालानुसार, १५ टक्के लोकसंख्या इंटरनेट आणि मोबाइलपासून वंचित आहे. या संदर्भात पाकिस्तानमध्ये किंचितशी सुधारणा झाली असली तरी त्याची कामगिरी जगभरातील सर्वांत वाईट कामगिरींमध्ये नोंदली गेली आहे. आशिया खंडात देशाचा क्रमांक तळाला आहे. ऊर्जासंकट आणि पूरपरिस्थितीमुळे लोडशेडिंग आणि ब्लॅकआऊटची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे इंटरनेट लोकांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा आल्या, असे अहवालात म्हटले आहे.

उपलब्धता, सामर्थ्य आणि तत्परतेच्या बाबतीत पाकिस्तानचा क्रमांक आशिया खंडातील २२ देशांमध्ये सर्वांत शेवटचा आहे. तर, संपूर्ण जगात पाकिस्तान ७९व्या स्थानी आहे. तसेच, इंटरनेट आणि मोबाइलच्या सुविधांचा विचार केल्यास ते वापरणाऱ्या महिला आणि पुरुषांमधील अंतर लक्षणीय आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

पश्चिम बंगालच्या केरळ स्टोरीवरील बंदीविरोधात निर्माते गेले सर्वोच्च न्यायालयात

महिलांची स्थिती अतिशय वाईट

या अहवालानुसार, महिलांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचवण्यात पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्व देशांमध्ये अशा सुविधांचा वापर करणाऱ्या महिला आणि पुरुषांमधील अंतर लक्षणीयरीत्या अधिक आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के पुरुषांकडे मोबाइल फोन आहेत, तर याच्या तुलनेत केवळ अर्ध्या महिलांकडे मोबाइल आहेत.

‘डिजिटल पाकिस्तान’ची प्रगती असमाधानकारक

पाकिस्तानचे सरकार डिजिटल गव्हर्नन्सच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी ‘डिजिटल पाकिस्तान’ मोहीम तेवढा वेग पकडू शकलेली नाही. सन २०२२मध्ये ओढवलेली भयावह पूरपरिस्थिती सरकारसाठी आव्हानात्मक होती. पुरामुळे सुमारे तीन कोटी लोकांना फटका बसला. तसेच, दूरसंचार आणि इंटरनेटच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.

सायबर गुन्ह्यांमध्येही सातत्याने वाढ

पाकिस्तानमध्ये डिसेंबर २०२२पर्यंत एक लाखांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींची नोंद झाली आहे. जी गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.

Exit mobile version