‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

सध्या क्रीडा विश्वात टी- २० विश्वचषकाचा बोलबाला असून रविवारी (२४ ऑक्टोबर) टी- २० विश्वचषक स्पर्धेमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केले. मात्र, या सामन्यानंतर ते आतापर्यंत सोशल मिडीया आणि विविध माध्यमांवर याच सामन्याची चर्चा अजूनही रंगली आहे. दरम्यान विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांनी अजब वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. यामध्ये पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील शेख राशीद या नेत्याने या सामन्याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानने तब्बल १४ वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेत तर टी- २० विश्वचषकात प्रथमचं भारताला पराभूत केलं. या मोठ्या विजयानंतर पाकिस्तानमधील सर्वच जनता आनंदी असून अनेक विधानं आता समोर येत आहेत. पण यामध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री असणारे शेख राशीद यांचे विधान सर्वात विचित्र आणि वादग्रस्त आहे. त्यांनी या विजयाला ‘इस्लामचा विजय’ असल्याचे म्हटले आहे. एका खेळाला धर्माचा रंग देत राशीद यांनी हे विधान केले आहे.

हे ही वाचा:

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

विधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’?

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

राशीद यांनी सामन्यानंतर पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले. त्यांनी या विजयाला इस्लामचा विजय असल्याचे तर म्हटलेच; पण सोबतच भारतीय मुसलमानांनाही पाकिस्तानचा विजय हवा होता, असेही म्हटले. ते भारतासोबत नाही तर पाकिस्तानसोबत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

राशीद हे सामना पाहण्यासाठी युएईला गेले होते, पण त्यांना सामन्याआधी परत यावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षासंबधी कामांमुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीच त्यांना माघारी बोलावले होते.

Exit mobile version