दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

बीप पाकिस्तान नावाचे ऍप काढणार

दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपला पाकिस्तानने स्वतःचा पर्याय आणला आहे. ‘बीप पाकिस्तान’ नावाचे ऍप पाकिस्तानच्या आयटी मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान मंडळाने विकसित केले आहे. पाकिस्तानचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अमिनुल हक यांनी अलीकडेच ‘बीप पाकिस्तान’ ऍपचे अनावरण केले.

 

‘आम्ही आता अभिमानाने सांगू शकतो की, पाकिस्तानकडे व्हॉट्सऍपचा पर्याय आहे. आम्हाला थोडा उशीर झाला आहे, परंतु कधीही न होण्यापेक्षा उशीर होणे चांगले आहे,’ असे ते यावेळी म्हणाले. सुरक्षा वाढवणे, संभाव्य सायबर हल्ले कमी करणे, संवेदनशील सरकारी संप्रेषण सुनिश्चित करणे हे मेड-इन-पाकिस्तान ऍपचे उद्दिष्ट आहे. ‘बीप पाकिस्तान’ ऍपच्या सर्व वापरकर्त्यांचा डेटा पाकिस्तानमधील सर्व्हरमध्ये आणि राष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान मंडळाच्या देखरेखीखाली संग्रहित केला जाईल. त्यामुळे ऑडिओ किंवा व्हिडिओ इतरांना ज्ञात होण्याचा धोका दूर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

भारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीदरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग

इम्रान खान यांना तुरुंगात माश्या, किड्यांचा त्रास

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

हे ऍप तीन टप्प्यांत दाखल होणार आहे. पहिल्या आणि आताच्या टप्प्यात हे ऍप केवळ सरकारी अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात, इतर मंत्रालये आणि विभागांना ते वापरता येईल. त्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पाकिस्तानभर सार्वजनिकरीत्या हे ऍप खुले केले जाईल. त्यासाठी गूगल प्लेस्टोअरल हे ऍप सूचीबद्ध करून या वर्षाच्या अखेरीस सामान्य लोकांसाठी ऍप आणण्याचे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. हे ऍप हळूहळू देशभरात व्हॉट्सऍपचा पसंतीचा पर्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प सन २०२० मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

 

 

‘बीप पाकिस्तान’ची वैशिष्ट्ये
ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन
मथळ्यांसह दस्तऐवज सामायिक करणे
त्वरित संदेश पाठवणारी यंत्रणा

Exit mobile version