23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाया व्यवस्थेमुळे पाकिस्तान 'ऑनर किलिंग' मध्ये अव्वल

या व्यवस्थेमुळे पाकिस्तान ‘ऑनर किलिंग’ मध्ये अव्वल

Google News Follow

Related

‘ऑनर किलिंग’ हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल, त्यासंबंधीच्या बातम्या पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ‘ऑनर क्राईम’ म्हणजे काय तर यात सहसा महिलेची कुटुंबातल्या पुरुषाकडून शिक्षा देण्यासाठी हत्या केली जाते. कुटुंबाची मान खाली जाईल, समाजात कुटुंबाचे नाव खराब होईल असे कृत्य या या महिलेने केले आहे, असा समज या पुरुषांचा असतो. महिलेची हत्या का केली हे सांगताना अनेक कारणं समोर केली जातात. त्यातली प्रमुख कारणं म्हणजे कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध जाऊन आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणं, घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करायला नकार देणं, लैंगिक छळ, बलात्काराला बळी पडणं, सासरी न नांदता माहेरी परत येणं, नवऱ्यापासून घटस्फोट मागणं, परपुरुषाशी संबंध ठेवणं, अशी अनेक कारणं पुढे करून महिलांची हत्या केली जाते. काही प्रकरणांमध्ये त्या महिलेने असं काही केलंय अशी फक्त शंका आली तरी कुटुंबातल्या सदस्यांनी त्या महिलेचा खून केल्याची अनेक उदाहरणं आहेत.

ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये पाकिस्तान जगात अव्वल ठरला आहे. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार, २००४ आणि २०१६ दरम्यान पाकिस्तानमध्ये तब्बल १५ हजार २२२ महिलांच्या हत्या झाल्या आहेत. म्हणजेच दरवर्षी १ हजार १७० आणि आठवड्याला २२ हत्या होतात. पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात डिसेंबर २०१८ ते २०१९ मध्ये ‘ऑनर किलिंग’ची १९७ प्रकरणं समोर आली. २०२० मध्ये २३७ पेक्षा जास्त प्रकरणे नोंदविण्यात आलीत तर २०२१ या वर्षात पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या ४५० पेक्षा अधिक घटनांची नोंद झाली आहे. आणि जगातल्या आकडेवारीनुसार ही संख्या जास्त आहे.

पाकिस्तानची एकूण लोकसंख्या ही २० कोटींहून अधिक आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या १३ कोटी होती. म्हणजेच, वीस वर्षांमध्ये पाकिस्तानच्या लोकसंख्येत सुमारे ७.५ कोटींची वाढ दिसून आली. देशातली मुस्लिम लोकसंख्या वाढून ९६.४७ टक्क्यांवर पोहोचलीये. २०१७ च्या जनगणनेच्या माहितीनुसार, पाकिस्तानात हिंदूंची संख्या केवळ १.७३ टक्के आहे. ख्रिश्चन नागरिकांची संख्या १.२७ टक्के. जैन धर्मीयांची संख्या तर देशात ०.१ टक्क्यांहून कमी आहे. एकूणच अल्पसंख्यांकांची लोकसंख्या धोक्यात आहे. हे पाकिस्तान कधीही मान्य करत नाही. मात्र, पाकिस्तानामधल्या अल्पसंख्याकांची परिस्थिती ही चिंताजनक असल्याचं पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने म्हटलेलं आहे. २०१९ च्या एका अहवालात आयोगाने म्हटलं होतं, की सिंध आणि पंजाबसारख्या प्रांतांमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर केलं जाते. पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांवर जे लोक काम करतात त्याचं म्हणणं आहे की, पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण म्हणजे ‘जिरगा व्यवस्था’.

जिरगा व्यवस्था म्हणजे काय?

जिरगा व्यवस्था म्हणजे काय तर एक प्रकारची पंचायत. या व्यवस्थेला सरकारचं पाठबळ आहे आणि त्यात अनेकदा अमानुष असे आदेश काढले जातात. जिरगा पद्धतीमुळे पाकिस्तानमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळतंय हे पाकिस्तानमधलं चित्र आहे. जून २००२ मध्ये मुझफ्फरगडच्या स्थानिक जिरग्याने मुख्तारन माई या महिलेच्या सामूहिक बलात्कारचे फर्मान जारी केले होते.

हे ही वाचा:

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिंकूवर झाला होता गोळीबार…

वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर्सनी घेतली टी-शर्टवर पंतप्रधानांची स्वाक्षरी

जम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंग रोखण्यासाठी कायदा आहे. जेव्हा सुरुवातीला हा कायदा आला तेव्हा काही काल तो कठोर होता. ऑनर किलिंगच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती, मात्र हळूहळू या कायद्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या, त्यानंतर हा कायदा खूपच कमकुवत झाला आणि लोकांमधली या कायद्याची भीती कमी झाली किंवा संपली. या कायद्याची भीती किती कमी आहे, याचा अंदाज पाकिस्तानमधल्या ऑनर किलिंगच्या घटनांच्या आकडेवारीवरून दिसून येतं.

पाकिस्तानमधलं ऑनर किलिंगची ताजी घटना म्हणजे उरुज अब्बास आणि अनीसा अब्बास या बहिणींची झालेली हत्या. दोन्ही बहीणींचं लग्न चुलत भावांशी करण्यात आलं. या बहिणींना हे लग्न मान्य नव्हत म्हणून त्यांनी फरकत मागितली तेव्हा कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी म्हणून त्यांना बोलावून त्यांची हत्या करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा