इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा जखमी

इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे पुन्हा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर उच्च न्यायालयात झालेल्या धक्काबुक्कीत इम्रान खान यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक- ए- इन्साफकडून (पीटीआय) देण्यात आली आहे.

पीटीआयचे खासदार शिबली फराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान हे मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात हजर झाले होते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना १० दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शाहबाज सरकारने पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे. तसेच न्यायालयाचा आदर करत असून प्रकृती सुधरल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होतील, असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

इम्रान खान यांना १८ एप्रिल रोजी लाहोर उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ३ मे पर्यंत जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत वाढवून न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती इम्रान खान यांनी केली होती. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करत त्यांना ३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा ही घटना घडली.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; आंदोलन पेटले

संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

लोक नाहीत सांगाती….

यापूर्वी, गेल्या वर्षी पाकिस्तानातील गुजरांवाला येथे संचलनात इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यावेळी त्यांना दुखापत झाली होती.

Exit mobile version