… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

केंद्र सरकारने शनिवार, २१ मे रोजी मोठा निर्णय घेत इंधनावर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भारतात प्रति लिटर पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. नागरिकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताच्या निर्णयावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

मोदी सरकारच्या या मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कौतुक केले आहे. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल विकत घेतलं, त्यामुळे त्यांना पेट्रोल- डिझेलचे दर कमी करून भारतीयांना दिलासा देता आला असे इम्रान खान म्हणाले. आमचं सरकार देखील याच दृष्टीने काम करत होते. मात्र, विरोधकांनी परकीय शक्तींच्या मदतीने सरकार पाडलं. आता सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाण्याची शक्यता असल्याचे इम्रान खान म्हणाले. भारताने जे केलं तेच आम्ही करणार होतो पण त्याआधीच सरकार उलथवून टाकण्यात आल्याचे इम्रान खान म्हणाले.

हे ही वाचा:

केंद्र सरकारकडून देशवासियांना मोठा दिलासा

राज ठाकरेंच्या सभेला १३ अटी

लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

यापूर्वीही इम्रान खान यांचे सरकार धोक्यात असताना त्यांनी भारतावर कौतुकाचा वर्षाव केला होता. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानमधील इम्रान यांचे सरकार पडले. मात्र, त्यांनी त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड सुरू ठेवली होती. दरम्यान त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर कौतुकाचा वर्षाव केला होता. भारताचे परराष्ट्र धोरण हे कसे स्वतंत्र आहे, नागरिकांच्या हिताचे आहे यावरून त्यांनी स्तुतीसुमने उधळली होती. तसेच त्यांनी भारतीय लाष्काराचे देखील विशेष कौतुक केले होते. भारतीय लष्कर हे कधीही राजकीय बाबींमध्ये ढवळाढवळ करत नाही असे म्हणत त्यांनी भारताचे कौतुक केले होते.

Exit mobile version