पाकिस्तानला कोविड-१९ साठीची लस मिळत नसल्याची माहिती पाकिस्तानमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चीनने बनवलेली लस केवळ ५०% परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानला परिणामकारक लस मिळणे दुर्मिळ झाले आहे.
भारत हा लस उत्पादनामध्ये जगात अग्रणीचा देश असल्यामुळे भारत केवळ स्वतःची गरज भागवत नसून मित्र राष्ट्रांनादेखील लसीचा पुरवठा करत आहे. भारताने बुधवारी ६ शेजारी देशांना लस पाठवली. यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, सेशल्स, म्यानमार या देशांचा समावेश आहे.
याउलट पाकिस्तानमध्ये लस उत्पादन करणारी किंवा कोणतेही औषध उत्पादन करणारी इंडस्ट्री नसल्याने पाकिस्तानकडे स्वतःची कोणतीही लस नाही. शिवाय भारताशी असलेले संबंध हे पाकिस्तानला भारतात बनवलेली लस मिळण्यापासून रोखत आहेत. अनेक वर्ष भारतात दहशतवादी हल्ले करवण्याचा असा परिणाम भोगावा लागेल असे पाकिस्तानला स्वप्नात सुद्धा वाटले नसेल. पाकिस्तानमधील सूत्रांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
भारताखेरीज अमेरिका आणि जर्मनीमध्ये बनलेल्या मॉडर्ना आणि फायझर या लसींची निर्मिती झालेली असली तर जवळजवळ सर्वच लसी युरोपीय आणि पश्चिमी देशांनी आगाऊ खरेदी करून ठेवल्यामुळे, त्या खूप कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.उपलब्ध असलेल्या लसींची किंमतही काही पटींनी जास्त आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानची औद्योगिक क्षमता या दोन्ही रसातळाला गेल्यामुळे पाकिस्तानला लसीची वानवा जाणवत आहे.