25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियापाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

पाकिस्तानकडून पुन्हा भारताच्या अंतर्गत मुद्द्यात ढवळाढवळ

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कलम ३७० हटवण्याबाबत आणि पुनर्स्थापनेबाबत वारंवार मुद्दा उपस्थित केला जात आहे. अशातच आता भारताच्या या अंतर्गत मुद्द्यामध्ये पाकिस्तानने नाक खुपसण्याचे काम केले आहे. पाकिस्‍तानने पुन्‍हा एकदा जम्‍मू- काश्‍मीरमधील कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यावर भाष्य केले आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावर प्रचार करत असताना दुसरीकडे काँग्रेस या मुद्द्यावर वक्तव्य करण्याचे टाळत आहे. मात्र, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पाकिस्तानचे मत समान असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पत्रकाराने ख्वाजा आसिफ यांना विचारले होते की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस निवडणुकीत म्हणत आहेत की आम्ही जिंकलो तर आम्ही ३५ अ आणि ३७० ची स्थगिती संपवू. हे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांचे महत्त्व असून त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. तो त्यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. पुढे पत्रकाराने विचारले की, पाकिस्तान सरकार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ऑफ इंडिया हे एकाच पानावर आहेत असे आपण म्हणू शकतो का? याबाबत ख्वाजा आसिफ म्हणाले की, ३७० कलमच्या मुद्द्यावर एकत्र आहोत. काश्मीरला पूर्वीचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी आमचीही मागणी आहे.

हे ही वाचा : 

दगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने निवडणूक प्रचारात जम्‍मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम पुनर्स्थापित करण्याचे आणि जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जम्मू- काश्मीरमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले तरी ते कलम ३७० अंतर्गत जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देऊ शकत नाहीत. याशिवाय लोकसभेत अल्पमतात असलेल्या काँग्रेसलाही जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळू शकणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा