कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानच्या रमीझ राजांनी खुर्ची गमावली

सूत्रे लवकरच नजम सेठी यांच्याकडे येण्याची शक्यता

कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानच्या रमीझ राजांनी खुर्ची गमावली

पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर रमीझ राजा यांची खुर्ची जाऊ शकते, अशी चर्चा होती. त्याप्रमाणे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सूत्रे लवकरच सेठी यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इम्रान खानच्या पक्षाने २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर नजम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या घटनेनुसार अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीझ राजाला २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते . इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाल्यावर रमीझ राजा यांची खुर्ची जाऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, रमीझने आपली खुर्ची बराच काळ टिकवण्यात यश मिळवले. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर

कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?

९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश

साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’

इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीझला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती. नजम सेठी बद्दल बोलायचे तर ते जून २०१३ते जानेवारी २०१४ , फेब्रुवारी २०१४ ते मे २०१४, ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांची ही चौथी टर्म असेल.

Exit mobile version