पाकिस्तानचा पलटवार; इराणवर एअर स्ट्राईक

दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा

पाकिस्तानचा पलटवार; इराणवर एअर स्ट्राईक

इराणने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले होते. इराणने हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. आता इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार,  पाकिस्ताननेही आता इराणवर हल्ला केला असून इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने इराणवर २० क्षेपणास्रे डागली असल्याचं वृत्त आहे. पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याबाबत इराण किंवा पाकिस्तानकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.

पाकिस्तानी माध्यमांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार, इराणमधील बीएलए दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (BLF) यासारखे बलूच फुटीरतावादी दहशतवादी गट इराणमध्ये सक्रिय आहेत, जे पाकिस्तानविरोधी कारवाया करतात. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी इराणमध्ये राहून पाकिस्तानविरुद्ध कट रचतात आणि हल्ले करतात. इराण अशा संघटनांना आश्रय देऊन मदत करतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जेव्हा जेव्हा पाकिस्ताननं इराणवर असे आरोप केले आहेत, तेव्हा तेव्हा इराणनं नेहमीच पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

श्रीराममंदिराची प्रतिकृती निघाली मुंबई ते न्यू-जर्सी

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

भारतीय संघासाठी चांगली बातमी! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत!

इराणने मंगळवारी पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याविरोधात पाकिस्तानने इराणला युद्धाचा इशारा दिला होता. तसंच, इराणने हद्दीचे उल्लंघन करून कुरापत काढली आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली होती. इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. तसेच दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम आणि दौरेही त्वरित रद्द केले.

Exit mobile version