जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने केली. यावेळी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने निदर्शने करणाऱ्यांना हातवारे करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर यावेळी या अधिकाऱ्याने अभिनंदन वर्धमान यांचा चहासोबत एक फोटोही धरला होता, जो तो वारंवार दाखवत होता. त्याचे हे कृत्य व्हिडीओमध्ये कैद झाले आहे.
लंडनमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय हातात फलक आणि झेंडे घेऊन जमले होते. हे लोक निष्पाप लोकांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करणारे घोषणा देत होते. यासोबतच हे लोक पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी करत होते. तेव्हा पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी लंडनमधील निदर्शकांना धमकीचे हावभाव करताना कॅमेऱ्यात कैद झाला.
#BREAKING | Pakistan Army Colonel Taimur Rahat caught on camera making throat-slitting gesture at Indian protestors in London.
He serves as Defence Attache at Pakistan’s UK Mission.#PahalgamTerroristAttack #UK #London #Pakistan pic.twitter.com/5KbELqzzXZ
— Organiser Weekly (@eOrganiser) April 26, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लंडनमधील उच्चायुक्तालयातील पाकिस्तानी लष्कर आणि हवाई सल्लागार कर्नल तैमूर राहत हे भारतीय समुदायाच्या निदर्शकांना गळा कापून धमकीचे हावभाव करताना दिसत आहेत. शुक्रवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ५०० हून अधिक ब्रिटिश हिंदूंनी पाकिस्तान दूतावासाबाहेर निदर्शने केली. भारतीय झेंडे, बॅनर आणि फलक हातात घेऊन निदर्शकांनी निष्पाप जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी केली. त्यांनी दहशतवादाविरुद्ध घोषणाबाजी केली आणि अशा हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटांना पाठिंबा आणि आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.
हे ही वाचा :
बालाघाटमध्ये ६२ लाखांचे बक्षीस असलेल्या चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
गुजरातमधून ५५० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना घेतलं ताब्यात
पुलवामा, शोपियान, कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे स्फोटकांनी उडवली
पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार
एका निवेदनात, आयोजकांनी म्हटले आहे की, हा निषेध न्याय आणि जबाबदारीची मागणी करणारा होता. एएनआयशी बोलताना, भारतीय डायस्पोराच्या एका सदस्याने सांगितले की, “आम्ही भारतीय येथे पाकिस्तानविरुद्ध निषेध करण्यासाठी जमलो आहोत. त्यांनी (पाकिस्तानने) दहशतवादी कारखाना जोपासला आहे आणि त्यामुळे पहलगाममध्ये आमचे २६ लोक मारले गेले. आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी जमलो आहोत.”