भारताकडून नोटीस मिळताच पाकिस्तानने टेकले गुडघे टेकले

 सिंधू जल करारावर चर्चा करण्याची तयारी

भारताकडून नोटीस मिळताच पाकिस्तानने टेकले गुडघे टेकले

पाकिस्तानने सीमापार नद्यांच्या व्यवस्थापनासाठी १९६० च्या सिंधू जल करारामध्ये सुधारणा करण्यासाठी जानेवारीमध्ये पाठविलेल्या पत्राला उत्तर दिले आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे. पाकिस्तानने या कराराची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. सिंधू जल करारावर कॅचरचा करण्याची तयारी पाकिस्तानने दाखवली आहे. पाकिस्तानने पाठवलेल्या उत्तराचा सध्या अभ्यास करण्यात येत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानच्या आक्षेपांवर मात करण्यासाठी जागतिक बँकेने भारत आणि पाकिस्तानला परस्पर सहमतीपूर्ण मार्ग शोधण्यास सांगितले होते. परंतु पाकिस्तानने भारतासोबत कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यास नकार दिला होता परिणामी भारताला पाकिस्तानला नोटीस बजावावी लागली होती. आता कराराच्या अनुच्छेद १२ नुसार, विवादातील पक्ष, भारत आणि पाकिस्तान, द्विपक्षीय करारात बदल करेपर्यंत विद्यमान करार चालू राहील असे पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. भारताच्या चिंता ऐकून घेतल्यानंतरच करारातील बदलांबाबत वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना

भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!

काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात

भारताने १९६० च्या सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी कराराच्या कलमांतर्गत पाकिस्तानला जानेवारीमध्ये नोटीस बजावली होती. खरे तर हा मुद्दा एखाद्या तज्ज्ञाकडे सोपवावा, अशी भारताची इच्छा होती, परंतु पाकिस्तान सातत्याने त्यास नकार देत होता.भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करार झाला होता . या करारानुसार सतलज, बियास आणि रावी नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला येते आणि सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला येते. या करारानुसार भारत आणि पाकिस्तानचे जल आयुक्त वर्षातून दोनदा भेटतात.

Exit mobile version