मोठा घातपात टळला
दिल्लीच्या लक्ष्मी नगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून एके-४७ असॉल्ट रायफल, हँड ग्रेनेडसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
Delhi Police Special Cell arrests a terrorist of Pakistani nationality from Ramesh Park, Laxmi Nagar. He was living with a fake ID of an Indian national. One AK-47 assault rifle with one extra magazine and 60 rounds, one hand grenade, 2 sophisticated pistols with 50 rounds seized
— ANI (@ANI) October 12, 2021
न्यूज एजन्सी एएनआयने मंगळवारी (१२ ऑक्टोबर २०२१) ही माहिती दिली. दिली. मोहम्मद असरफ अशी त्याची ओळख असून तो पाकिस्तानच्या पंजाबचा रहिवासी आहे.
“दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लक्ष्मी नगरच्या रमेश पार्कमधून पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला अटक केली. तो भारतीय नागरिकाच्या बनावट ओळखपत्रासह राहत होता. एक एके-४७ असॉल्ट रायफल, गोळ्यांच्या ६० फैरी, एक हातबॉम्ब, २ अत्याधुनिक ५० राऊंडसह पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.” असे एएनआयने सांगितले. या दहशत्वाद्याविरुद्ध युएपीए (UAPA) आणि इतर तरतुदी लागू केल्या जात आहेत.
हे ही वाचा:
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर
नरिनच्या अष्टपैलू खेळीने कोलकाताला तारले
लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क येथील त्याच्या सध्याच्या पत्त्यावर शोधमोहीम राबवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दहशतवादविरोधी उपायांवर चर्चा केल्यानंतर तीन दिवसांनी हे घडले. ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी दहशतवाद्यांना स्थानिकांचा आधार घेण्यापासून कसे रोखता येईल यावर चर्चा केली.
As festive season began and new district DCsP took charge, @CPDelhi Sh Rakesh Asthana held crime and law & order review meeting today. Focus on antiterror measures, action on street and organised crime to be further geared up by #DelhiPolice to keep capital safe, citizens secure. pic.twitter.com/xf5RLVb0wc
— #DilKiPolice Delhi Police (@DelhiPolice) October 9, 2021
आदल्या दिवशी, जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात चकमकीदरम्यान लष्कर-ए-तैयबा (एलईटी)/द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे किमान तीन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी माहिती दिली की त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा आणि इतर आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.