पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसखोरी करत भारतीय नागरिकांची हत्त्या केली आहे. यावेळी ही घुसखोरी नियंत्रण रेषा पार करत जम्मू काश्मीरमध्ये नसून, सागरी सीमा पार करत पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर एका भारतीय मच्छिमाराची हत्या केली आहे. गुजरातच्या द्वारका येथे ओखा शहराजवळील ‘जलपरी’ नावाच्या बोटीवर पाकिस्तानी नौदलाने गोळीबार केला होता. या गोळीबारात श्रीधर नावाच्या एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मार्चमध्ये पण पाकिस्तानने ११ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. त्यांच्या दोन बोटीही जप्त केल्या होत्या. फेब्रुवारीमध्येही, पाकिस्तानने १७ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तेंव्हाही पाकिस्तानने त्यांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या होत्या.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

PM मोदी पुन्हा अव्वल

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

यावेळी पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एका मच्छिमाराला ठार मारल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप या संदर्भात सविस्तर माहिती मिळालेली नाही.

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये अनेकवेळा गोळीबार करत युद्धविराम कराराचे उल्लंघन केले आहे. परंतु यावेळी पाकिस्तानी नौदलानेही भारतीय मासेमारी नौकांवर गोळीबार करत एका निर्दोष मच्छीमाराची हत्या केली आहे.

Exit mobile version