पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?

पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?

खैबर पख्तूनख्वा प्रांतात खुर्रममध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याच्या कॅप्टनसह १२ ते १५ जवानांचा मृत्यू झालाय. याशिवाय अनेक सैनिक गंभीर जखमी झालेत. याशिवाय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून, पाकिस्तानी सैन्याच्या ६३ जवानांचं अपहरणही करण्यात आलं आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानचा संबंध नाही. गेली अनेक वर्ष पाकिस्तान, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला “बॅड तालिबान” तर अफगाणिस्तानमधील तालिबानला “गुड तालिबान” असं संबोधत आहे.

पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान विरोधात सोमवारी एक मोहिम सुरू असताना पाकिस्तानी सैन्याला मोठं नुकसना सहन करावं लागलं. या दरम्यान अनेक सैनिक मारले गेले. यात २८ बलूच रेजिमेंटचे कॅप्टन अब्दुल बासित यांचाही समावेश आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच तालिबानने पाकिस्तानला एक गंभीर इशारा दिला होता. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन म्हणाला होता, “तालिबान आणि अफगानिस्तानमध्ये चर्चेतून सामंज्यस करार करण्यासाठी मदत करण्यासाठी पाकिस्तानचं स्वागत आहे. मात्र,पाकिस्तान आम्हाला निर्देश देऊ शकत नाही किंवा त्यांचे विचार आमच्यावर थोपवू शकत नाही.”

हे ही वाचा:

‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

कच्छमध्ये होणार भारतातील सर्वात मोठे सोलर पार्क

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘ट्राइब्ज इंडिया’ चे विशेष राखी कलेक्शन

दरम्यान पाकिस्तानने याच आठवड्यात अनेक दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये सोडल्याची बातमी आली होती. हे दहशतवादी तालिबानसोबत हातमिळवणी करून अफगाणिस्तान सरकार आणि सैन्याविरुद्ध लढणार आहेत. पाकिस्तानी दहशतवादी आणि तालिबान एकत्र येऊन अफगाणिस्तानमध्ये पुन्हा शरियावर आधारित इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी एकत्र आले आहेत.

Exit mobile version