31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरदेश दुनियाबॅडमिंटन सम्राज्ञी पीव्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत हाती धरणार तिरंगा

बॅडमिंटन सम्राज्ञी पीव्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत हाती धरणार तिरंगा

Google News Follow

Related

भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताची ध्वजवाहक होणार असून, गुरुवार २८ जुलै रोजी समारंभात एकूण १६ ऍथलिट्स सहभागी होणार आहेत. परंतु नीरज चोप्राने राष्ट्रकुल जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले तेव्हा मांडीच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) नीरजच्या जागी सिंधूची निवड केली. सोबतच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह देखील राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संघाचा ध्वजवाहक असणार आहे. या अगोदर सिंधू २०१८ मध्ये गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजवाहक झाली होती. अशी माहिती अससोसिएशनच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पीव्ही सिंधूला बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात टीम इंडियाचा ध्वजवाहक म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे”.

राष्ट्रकुल स्पर्धा गाजवणारे स्पर्धक….

२२ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहेत. देशभराह खेळाडू सहभागी होणार आहेत, यामध्ये भारताचे खेळाडू ही सहभागी झाले आहेत. परंतु स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे बाहेर पडला आणि तिहेरी उडी स्पर्धेमधील ऐश्वर्या बाबू डोपिंग चाचणीत दोषी आढळली.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचे हायकमांड म्हणजे सिल्व्हर ओक!

विरोध ईडीला, भ्रष्टाचाराला नाही!

‘कांजूरमार्ग’ मेट्रो स्थानकाची ‘उंच’ भरारी!

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभत नाही!

 

चोप्रा यांच्या अनुपस्थितीत ध्वजवाहक म्हणून वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांचाही विचार झाला होता अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिली. अखेर सिंधू आणि मनप्रीत यांना हा मान दिला आहे. बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे .

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने रौप्यपदक (सिल्वर मेडल) जिंकले होते. अंतिम फेरीत भालाफेक करताना त्याने मांडीला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा