…आणि चिदंबरम यांच्यावर लोक चिडले!

…आणि चिदंबरम यांच्यावर लोक चिडले!

दिल्ली-न्यूयॉर्क विमानतिकिटाच्या रकमेबाबत केले होते ट्विट

मंगळवारी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री तिकिटावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले. नाही, निवडणुकीचे तिकीट नाही तर दिल्ली-न्यूयॉर्क इकॉनॉमी क्लासचे तिकीट. या तिकिटाची किंमत ७.२ लाख आहे, असा दावा करत त्यांनी ट्विट केले होते.

हेही वाचा:

अल्पप्रतिसादामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द

विस्तारा करणार देशातील डॉक्टरांसाठी मोफत उड्डाणे

संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींची बदनामी सहन करणार नाही

१ मे पासून भारतात येणार रशियन स्पुतनिक व्ही लस

काँग्रेसच्या राजवटीत अर्थमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘दिल्ली-न्यूयॉर्क इकॉनॉमी क्लासच्या एकावेळच्या प्रवासासाठी तिकिटाची किंमत ७.२ लाख रुपये आहे. याचा अर्थ ती किंवा तो तिकीट खरेदी करत आहेत की, विमानच भाड्याने घेत आहेत,’ असे चिदंबरम यांनी ट्विट केल्यानंतर त्यावर लोकांनी टीकेचा भडीमार केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपाचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांचे एक ट्विट रिट्विट केले ज्यात रवी यांनी चिदंबरम यांना लक्ष्य केले आहे. रवी यांनी म्हटले होते की, एकेकाळी हे काँगी अर्थमंत्री, गृहमंत्री होते पण २१व्या शतकात ते गोबेल्स बनण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. हे ट्विट करतानाच रवी यांनी त्यात तिकिटाची योग्य किंमत असलेला फोटोही शेअर केला. त्यात साधारणपणे १ लाख ७२ हजार इतकी रक्कम तिकिटासाठी लागत असल्याचे दिसत आहे.

चिदंबरम यांच्या या ट्विटवर अनेक लोकांनी या प्रवासाच्या ७.२ लाख किमतीपेक्षाही कमी किमतीच्या वेगवेगळ्या तिकिटांच्या किमतीचे फोटो टाकून चिदंबरम यांना लक्ष्य केले. चिदंबरम यांच्याकडे बराच वेळ असल्यामुळे ते अशी ट्विट करून टाइमपास करत आहेत, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली.

Exit mobile version