गुजरातहून महाराष्ट्रात येणार ४४ टन ऑक्सिजन

गुजरातहून महाराष्ट्रात येणार ४४ टन ऑक्सिजन

प्रत्येकी १४ टन द्रवरूप ऑक्सिजनचे तीन टँकर वाहून नेणारी ऑक्सिजन विशेष एक्स्प्रेस गुजरात, राजकोटच्या हापा येथून महाराष्ट्राकडे निघाली आहे.

हेही वाचा:

ठाकरे सरकारने या चार गोष्टी केल्या असत्या तर…

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

सौदी अरेबियाने दिला भारताला ८० टन ऑक्सिजन

जयंत पाटील अनिल देशमुखांचे वॉचमन आहेत का?

महाराष्ट्राला करोनाच्या वाढत्या संसर्गात आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्तरातून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून हे तीन टँकर कळंबोली, नवी मुंबईत दाखल होतील. हे तीन टँकर रिलायन्स उद्योगातून पाठवले जाणार आहेत. जामनगर, गुजरातमधून हे टँकर रविवारी निघणार आहेत. सोमवारी ते महाराष्ट्रात पोहोचतील. चौथी ऑक्सिजन एक्स्प्रेस लखनौवरून रविवारीच निघणार आहे. पुढील काही दिवस रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार या ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचा पुरवठा विविध ठिकाणी करणार आहेत.
विशाखापट्टणम येथून पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात आली होती. त्यातून सात ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. प्रथम नागपूर नंतर नाशिकला हे टँकर पोहोचले.
गुजरातपासून सुमारे ८६० किमी अंतर कापून ही एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या तिन्ही टँकरचे वजन अंदाजे ४४ टन (४४०६० किग्रॅ) इतके असेल.

Exit mobile version