सौदी अरेबियाने दिला भारताला ८० टन ऑक्सिजन

सौदी अरेबियाने दिला भारताला ८० टन ऑक्सिजन

भारतात ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता नरेंद्र मोदी सरकारने राज्याराज्यांत ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी जी आश्वासक पावले उचलली आहेत, तशीच परदेशातूनही ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याची काळजी घेतली आहे. आता सौदी अरेबियातून ८० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आणला जात आहे. अदानी उद्योगसमूह आणि लिंडे कंपनी यांच्या सौजन्याने या ऑक्सिजनचा साठा भारतात आणण्यात येणार आहे.

हेही वाचा:

ठाकरे सरकारने या चार गोष्टी केल्या असत्या तर…

जयंत पाटील अनिल देशमुखांचे वॉचमन आहेत का?

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

सौदी अरेबिया, रियाध येथील भारतीय दुतावासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताच्या दुतावासाला अदानी उद्योगसमुह आणि लिंडे यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटतो की, भारताला आवश्यक असलेला ८० मेट्रीक टन ऑक्सिजन त्यांच्यावतीने पाठविण्यात येत आहे. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे खूप आभार.
उद्योगपती गौतम अदानी यांनीही रियाधच्या भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शब्दांपेक्षाही कृती महत्त्वाची. जगभरातून ऑक्सिजनचा पुरवठा भारताला व्हावा यासाठी आपण मोहीम उघडली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दम्माम ते मुंद्रा येथे ८० टन द्रवरूप ऑक्सिजन आणला जात आहे.
भारतातील रुग्णांची संख्या गेल्या २४ तासात साडेतीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्या परिस्थितीत सर्वत्र ऑक्सिजनची गरज आहे. त्या हेतूने परदेशातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यानिमित्ताने सिंगापूरहून हवाईमार्गे टँकर आणले गेले आहेत.

 

Exit mobile version