29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियाभारताने 'ही' मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

Google News Follow

Related

संकटसमयी मित्रांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या भारताने पुन्हा एकदा मैत्रीधर्म निभावला आहे. कोविडच्या या कठीण काळात बांगलादेशला भारताकडून एक महत्वाची मदत पाठवली जात आहे. कोविड काळात भारताची ऑक्सिजनची गरज भागवत देशाच्या कानाकोपऱ्यात द्रवरूपी ऑक्सिजनचा पुरवठा करणारी ऑक्सीजन एक्सप्रेस आता सीमोल्लंघन करणार आहे.

पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची ही ऑक्सिजन एक्सप्रेस बांग्लादेशात दाखल होणार आहे. आपल्या शेजारील मित्रराष्ट्र असणाऱ्या बांगलादेशच्या मदतीसाठी भारताकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून बांग्लादेशला तब्बल २०० मेट्रिक टन इतका द्रवरूप ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.

कोविड महामारीच्या परिस्थिती जेव्हा देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूपी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. तेव्हा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन पाठवला जात होता. तेव्हा हे दळणवळण सुलभ आणि जलद व्हावे यासाठी भारतीय रेल्वेमार्फत ऑक्सिजन एक्सप्रेस हे अभिनव संकल्पना राबवण्यात आली. या योजनेचे यश बघता आता आपल्या शेजारील मित्रराष्ट्रांनाही अशाप्रकारे ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे.

हे ही वाचा:

मालाडमधील त्या रहिवाशांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

मीराबाई चानूने रौप्य पदक उचलले

एरोटीका म्हणजे पॉर्न नाही…माझे पती निर्दोष

बांग्लादेशपासून याची सुरुवात होणार आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसची ही परदेशातील पहिलीच मोहीम ठरणार आहे. आज २४ जुलै रोजी या संदर्भातील दक्षिण पूर्व रेल्वे विभागाअंतर्गत २०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी चक्रधरपूर इथल्या टाटा कार्यालयात करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन बांग्लादेशातील बेनापोल येथे जाणार आहे. आज सकाळी सडे नऊच्या सुमारास हा द्रवरूप ऑक्सिजन भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे बांग्लादेशमधील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा भारत हा संकटकाळात धावून जाणारा सच्चा मित्र आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा