26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाकशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

Google News Follow

Related

ऑक्सिजनची विविध राज्यांना असलेली गरज भागविण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेसचा नामी पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. मालगाडीवरून ऑक्सिजनचे टँकर देशातील विविध राज्यांत पोहोचविण्याचा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतला असून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस आजपासून राज्याराज्यांत हा पुरवठा वेगाने करणार आहे. या एक्स्प्रेसला कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रथमच अशा पद्धतीची वेगवान सुविधा केंद्राने रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे निर्यातीसाठी वापरले जाणारे क्रायोजेनिक टँकर्स आता ऑक्सिजन वाहण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भातील गांभीर्यही मोदी सरकारने दाखविले आहे.

नवी मुंबईतील कळंबोली स्थानकातून विशाखापट्टणच्या दिशेने पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. महाराष्ट्रातून १० रिकामे टँकर मालगाडीने विशाखापट्टणम येथे जाणार असून ते तिथे भरल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आणले जाणार आहेत. विशाखपट्टणम व्यतिरिक्त जमशेदपूर, रुरकेला, बोकारो या ठिकाणांहून हे टँकर भरून विविध राज्यांत पाठविले जाणार आहेत. क्रायोजेनिक कंटेनर किंवा टँकरमधून हा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाई मार्गे किंवा रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा करा, अशी मागणी केली होती. पण लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा या मार्गाने करणे धोकादायक असते. म्हणूनच क्रायोजेनिक टँकरची गरज लक्षात घेऊन त्यांचा निर्यातीसाठी होणारा वापर बंद करण्यात आला आणि ते टँकर ऑक्सिजन एक्स्प्रेसने ऑक्सिजन वाहून नेण्यासाठीच उपयोगात येतील, याची काळजी मोदी सरकारने घेतली.

हे टँकर मालगाडीत चढविण्यासाठी कळंबोली येथे रॅम्पही उभारण्यात आले आहेत. अवघ्या एका दिवसातच या रॅम्पची उभारणी करण्यात आली. ८० टनाचा टँकर या रॅम्पवरून वर चढवून तो मालगाडीच्या रिकाम्या डब्यात उभा करण्यात येईल. हे रिकामे टँकर या मालगाडीतून जमशेदपूर, विशाखापट्टणम, बोकारो याठिकाणी जातील. तिथे पोलादनिर्मितीचे जे कारखाने आहेत, तिथून ही ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यात येईल. सध्या उद्योगांपेक्षा करोना रुग्णांसाठी या ऑक्सिजनची गरज अधिक असल्याने या उद्योगांकडून ऑक्सिजनचा पुरवठा ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचतही होणार आहे. क्रायोजेनिक टँकरमध्ये द्रवस्वरूपातील वायू भरून नेता येणे शक्य असते. हे टँकर ८ हजार ते १४ हजार लिटर क्षमतेचा द्रवरूप वायू वाहून नेऊ शकतात. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अशा टँकरचा विशेष वापर होतो.

हे टँकर ऑक्सिजनने भरून पुन्हा महाराष्ट्रात आणले जाणार आहेत. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या (एल.एम.ओ.) रूपातील हे ऑक्सिजन टँकरमध्ये भरून महाराष्ट्रात आल्यावर इथल्या विविध जिल्ह्यात ते पोहोचविले जातील. या रेल्वेच्या ने-आणीचा खर्च प्रत्येक राज्याला उचलावा लागणार आहे. जे टॅंकर मालगाडीतून नेण्यात येतील, त्यांच्यासोबत त्यांचे चालक किंवा कर्मचाऱ्यांना जाता येईल. त्यांना द्वितीय श्रेणीचे तिकीट काढावे लागेल. केवळ दोन जणांना या टँकरसोबत जाता येणार आहे. हे टँकर क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचे असतील.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे ने-आण करणे हे सोपे काम नाही. त्यात मोठा धोका असतो, त्यामुळे त्यासाठी रेल्वेने काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. कळंबोली आणि बोईसर येथे टँकर मालगाडीत चढविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मागे लॉकडाउनच्या काळात पाण्याचा तुटवडा भासत असताना रेल्वेच्या माध्यमातून पाण्याची ने-आण टँकरच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून केली जात होती. तशीच सुविधा आता रेल्वेने ऑक्सिजनच्या ने-आणीसाठी केलेली आहे.
केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरज भागविली जाणार आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राकडून केंद्राकडे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी आता या वेगवान मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

‘नऊ क्षेत्र वगळता २२ एप्रिलपासून तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असं केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे.
कोविडचं संकट येण्यापूर्वी भारतात दर दिवशी १,०००-१,२०० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, १५ एप्रिलला देशात ४७९५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागच्या वर्षीपासून ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली

आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?

या ऑक्सिजन एक्स्प्रेसविषयी महत्त्वाचे

  • ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून केंद्र पुरविणार राज्यांना ऑक्सिजन
  •   मालगाडीतून ऑक्सिजनचे क्रायोजेनिक टँकर ऑक्सिजन वाहून नेतील
  •  लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या रूपात हा ऑक्सिजन असेल.
  •  जमशेदपूर, बोकारो, रुरकेलामधून ऑक्सिजन उपलब्ध होणार
  •  पोलाद निर्मिती कारखान्यातून या ऑक्सिजनचा पुरवठा
  •  कळंबोलीहून ऑक्सिजन एक्स्प्रेस सुटणार
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा