भारतात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. दररोज वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. भारताला जगभरातून विविध वैद्यकिय मदत पाठवली जात आहे. त्यापैकीच युकेने पाठवलेले १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज दिल्लीत पोहोचले आहेत.
भारताला सध्या खास करून ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी विविध देशांनी द्रवरुप ऑक्सिजनच्या वहनासाठी आवश्यक असलेले क्रायोजेनिक टँकर पाठवले होतेच, परंतु त्यासोबत रुग्णांना वरदान ठरणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा देखील केला जात आहे. आज ब्रिटनने पाठवलेले १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबद्दल सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केले आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा
महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण
दाभाडकर काकांच्या मुलीने केली टीकाकारांची तोंडे बंद
सिंगापूरचा मदतीचा हात; आले २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स
Cooperation with UK continues. Welcome another shipment from the United Kingdom, containing 120 oxygen concentrators that arrived early this morning: Arindam Bagchi, Official Spokesperson, Ministry of External Affairs (MEA)#COVID19 pic.twitter.com/u1qHyL7SFX
— ANI (@ANI) April 29, 2021
भारतातील कोविड रुग्णवाढीचा वेग भयावह आहे. गेल्या २४ तासात देखील भारतातील एकूण रुग्णवाढ तीन लाखांच्या पुढेच राहिली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण पडत आहे. भारतातील गंभीर अवस्था लक्षात घेता, जगातून मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जात आहे. सौदी अरेबिया, सिंगापूर, जर्मनी यासारख्या विविध देशांनी ऑक्सिजनच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक टँकरची मदत केली. त्याशिवाय अमेरिकेतील काही संघटनांनी मिळून भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील पाठवले होते.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताने आता लसीकरण देखील वाढवण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्याचे ठरविण्यात आले आहे.