25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाकाश्मीर हे स्वतंत्र राज्य... विषयावरील कार्यक्रमाला ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनियनच्या हिंदू विद्यार्थ्यांचा विरोध

काश्मीर हे स्वतंत्र राज्य… विषयावरील कार्यक्रमाला ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनियनच्या हिंदू विद्यार्थ्यांचा विरोध

दहशतवादाशी संबंधित लोकांचा केला निषेध

Google News Follow

Related

‘धीस हाऊस बिलिव्हज इन द इन्डेपेन्डन्ट स्टेट ऑफ काश्मीर’ या वादग्रस्त विषयावर ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनियनच्या कार्यक्रमात भारतीय तसेच हिंदू विद्यार्थ्यांनी जबरदस्त निषेध केला आणि हा कार्यक्रम हाणून पाडला.

या संस्थेने मुझम्मिल अय्यूब ठाकूर आणि झफर खान या दोन वक्त्यांना आमंत्रित केले होते. त्याला या भारतीय तसेच हिंदू विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. हे दोघेही स्वतंत्र काश्मीरचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) ही दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले. भारतीय विद्यार्थी आदर्श मिश्रा याने जेकेएलएफवर टीका केली. आदर्शने काश्मिरी पंडितांच्या हत्येसाठी तसेच बर्मिंगहॅममध्ये हिंदू सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येसाठी या संस्थेला जबाबदार धरले. आदर्शने म्हटले की, या संस्थेच्या अध्यक्षांविरोधात मी अविश्वास ठराव आणत आहे. कारण या संस्थेचे अनेक सदस्य हे अध्यक्षांवर विश्वास ठेवत नाहीत. सदर अध्यक्ष हा आयएसआयचा, पाकिस्तानचा एजंट आहे.

हे ही वाचा:

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

चॅम्पियन्स स्पर्धेचा करंडक पीओकेमध्ये आणण्याची योजना आखणाऱ्या पीसीबीला आयसीसीने फटकारले!

आदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवलीय, कधीही डिबेटसाठी तयार!

सज्जाद नोमानींची धमकी, महाराष्ट्रात महायुतीला पराभूत करा, तर मोदी सरकार पडेल!

या विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्डच्या बाहेर आंदोलन केले. त्यावेळी घोषणाबाजीही झाली. ऑक्सफर्ड युनियन ही दहशतवाद्यांच्या बाजुने आहे.भारत माता की जय, वंदे मातरम. ब्रिटिश हिंदू आणि भारतीयांची संघटना इनसाइट यूके यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले की, जम्मू काश्मीर हा भारताचा भाग होता, भारताचा भाग आहे आणि भारताचाच भाग राहील.

इनसाइट युकेने म्हटले आहे की, मुझम्मिल अयुब ठाकूर हा दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्कॉटलंड यार्डकडून त्याची चौकशीही झालेली आहे. झफर खान याचा जेकेएलएफमधील सहभागाविषयीही इनसाइट युकेने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा