महादेव बेटिंग ऍप प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. महादेव बेटिंग ऍपचा मालक रवी उप्पल याच्या दुबईतून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे.
रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पल याला अटक केली आहे.
सौरव चंद्राकर हा पूर्वी रायपूरमध्ये ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला. सौरव आणि रवी यांच्याकडे मोठी संपत्ती असण्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून रोकड दुबईला पाठवण्यात आली. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून महादेव बेटिंग ऍप इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत केली आहे. महादेव बेटिंग ऍप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय काही बॉलीवूड कलाकारही या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
हे ही वाचा:
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल
महादेव ऍप सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. या ऍपला भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे ऍप अद्यापही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.