अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर भविष्यातील अराजकता लक्षात घेता तिथले नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील भीषणता दाखवणारा एका फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या १३४ सीटर विमानात तब्बल ८०० लोकांनी प्रवेश केल्याचं आणि तिथेच ठिय्या मांडल्याचं या फोटोतून दिसतंय.
Don’t just look at it. Look into it. One picture. So many stories.#Afghanistan pic.twitter.com/aUTLWSJtzx
— Zain Awan🇮🇳 (@zayen) August 17, 2021
अमेरिकन संरक्षण आणि सुरक्षा न्यूज वेबसाईट डिफेन्स वननं अमेरिकेच्या कार्गो विमानातील फोटो प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या सी-१७ ग्लोबमास्टरमध्ये जवळपास ६४० अफगाणिस्तानचे नागरिक एकमेकांना चिकटून बसलेले पाहायला मिळाले. आतापर्यंत या विमानातून इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिक विमानात बसले होते. फोटोमध्ये अफगाणी नागरिक आणि महिला देखील दिसत आहेत. त्या लोकांना काबूलमधून कतारला आणलं गेलं. काही लोक विमानाच्या रॅम्पमधून आत घुसले होते.
विमानात प्रवेश केलेल्यांपैकी ६४० लोक हे अफगाणी नागरिक आहेत. अमेरिकन सैन्याने त्यांना वारंवार बाहेर जायला सांगितले तरीही ते ऐकत नव्हते. त्यांनी विमानातच मिळेल त्या ठिकाणी ठिय्या मांडला. अफगाणिस्तानमध्ये राहिलो तर आपल्याला ठार मारलं जाईल असं सांगत तुम्ही घेऊन जाल तिकडे येतो पण उठणार नाही अशी भूमिका या नागरिकांनी घेतली.
शेवटी या विमानातील क्रुचा नाईलाज झाला. त्यांनी या विमानातील सर्व सीट्स काढून टाकल्या. त्यानंतर सर्व लोकांनी खालीच ठिय्या मांडला. या ८०० लोकांसहित विमानाचे उड्डाण करण्याचा धाडसी निर्णय वैमानिकांनी घेतला. इतक्या मोठ्या प्रवाशांसोबत उड्डाण करण्याचा हा एक विक्रमच असल्याचं सांगितलं जातंय.
हे ही वाचा:
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका
तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला असला तरी काबूल विमानतळ आणि हवाई वाहतूक नियंत्रण अमेरिकेच्या ताब्यात आहे. सोमवारी देश सोडून जाणाऱ्या अफगाण नागरिकांनी काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी केल्यानं बंद करण्यात आलेलं अफगाणिस्तानचं काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा सुरु करण्यात आलंय.