तुर्कीत भूकंपाचे तांडव .. झोपेतच ६०० जणांचा मृत्यू.. इमारती कोसळल्या

पंतप्रधान मोदी यांचा दिलासा

तुर्कीत भूकंपाचे तांडव .. झोपेतच ६०० जणांचा मृत्यू..  इमारती कोसळल्या

पहाटे साखर झोपेतच आलेल्या भयानक भूकंपाने तुर्की आणि आसपासच्या शहरांना हादरवून टाकले आहे. सुमारे ७. ८ रिश्टर स्केल क्षमतेच्या या तीव्र भूकंपाने तुर्कीमध्ये आतापर्यंत २८४ जणांचे बळी गेलेलं असून ४४० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीरियामध्ये २३७ लोक ठार तर ६३९ लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमानावर पडझड झालेली असून १३० पेक्षा जास्त इमारती कोसळल्या आहेत.

तुर्की आणि ईराणच्या सीमेवर यापूर्वी भूकंप आला होता. हा भूकंप इतका जबरदस्त होता की इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराक पर्यंत त्याचे झटके जाणवले आहेत नूरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानमध्ये २८४ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २,३०० लोक जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपपासून सुमारे ३३ किलोमीटर आणि नूरदगी शहरापासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर होता. सीरियापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार की आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दहा शहरांमधील १,७०० पेक्षा जास्त इमारतींचे नुकसान झाले आहे. अंकारा, गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरामध्ये जास्त नुकसान झाले आहे. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदी यांचा दिलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपाच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्यामुळे मी दु:खी असल्याचे त्यांनी सांगितले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. भारत तुर्की लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि या दु:खद घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

Exit mobile version