भारत आणि रशिया या दोन देशांमधील मैत्री जगजाहीर असून हे दोन्ही देश नेहमी एकमेकांच्या पाठीशी कायम उभे असतात. हीच दोन देशांमधील मैत्री अनेकदा दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्येही दिसून येते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियातील कझान शहरात होत असलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी त्यांनी रशिया- युक्रेन संघर्षात भारताच्या शांततापूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
रशिया दौऱ्यावेळी रशियाने केलेल्या आदरातिथ्याबद्दल नरेंद्र मोदींनी आभार व्यक्त केले. तसेच चर्चेवेळी पुतीन यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. पुतीन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केलं. मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध विशेष असून आणि ते गतिमानपणे विकसित होत आहेत, असं पुतीन यांनी म्हटले. यावेळी पुतीन यांनी आणखी एक विधान केलं त्यावर नरेंद्र मोदी यांनी खळखळून हसून पुतीन यांच्या विधानाचे समर्थन केले. पुतीन म्हणाले की, “आमचे संबंध इतके घनिष्ठ आहेत की, आम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही,” अशी मिश्किल टिप्पणी पुतीन यांनी केली. पुतीन यांचा या टिप्पणीचा हिंदी अनुवाद ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदीही हसले.
हे ही वाचा:
शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच
पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!
ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत…
उज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाणार
पंतप्रधान मोदी यांनी या भेटीवेळी म्हटलं की, “गेल्या तीन महिन्यांतील त्यांच्या दोन रशियाच्या भेटी दोन्ही देशांमधील घनिष्ठ समन्वय आणि सखोल मैत्री दर्शवतात. ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे. जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या वार्षिक शिखर परिषदेने प्रत्येक क्षेत्रात आमचे सहकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला. १५ वर्षांत ब्रिक्सने आपली खास ओळख निर्माण केली. आता अनेक जगातील देशांना त्यात सामील व्हायचे आहे,” असं मोदींनी म्हटलं.