रशियन रॉकेटवरही झंडा उँचा रहे हमारा!

रशियन रॉकेटवरही झंडा उँचा रहे हमारा!

रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे रशियानेही अनेक देशावर निर्बंध घातले आहेत. रशियाने त्यांच्या रॉकेटवरून अनेक देशाचे ध्वज हटवले आहेत. मात्र भारताचा तिरंगा रशियाने रॉकेटवर कायम ठेवला आहे. याचा व्हिडिओ रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी शेअर केला आहे.

दिमित्री रोगोझिन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “बायकोनूरमधील आमच्या टीमने ठरवले की आमचे रॉकेट काही देशांच्या ध्वजशिवाय चांगले दिसेल.” रॉकेटवर भारताचा ध्वज तसाच ठेवत अमेरिका, जपान, ब्रिटनचे ध्वज हटवले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे ध्वज कझाकस्तानमधील बायकोनूर येथील रशियन प्रक्षेपण पॅडवरून रशियन अंतराळ रॉकेटमधून काढले गेले आहेत.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनवरील आक्रमणाचा बदला म्हणून अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. युक्रेनसोबतचे युद्ध आणि त्यानंतर आलेल्या निर्बंधांदरम्यान रशियाने अमेरिका, ब्रिटन आणि जपानचे ध्वज हटवले, पण आपल्या अंतराळ रॉकेटवर भारतीय तिरंगा कायम ठेवला आहे. तसेच भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्याबाबतही रशियाकडून वेळोवेळी अलर्ट देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात याबाबत फोनवरून चर्चाही झाली आहे. त्यामुळे सध्या तरी भारत आणि रशियाच्या संबंधावर युद्धाचा परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही.

हे ही वाचा:

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाही

नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. युद्धाची तीव्रता अजूनही ओसरलेली नाही. युक्रेनमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर मोदी सरकारने एक आश्वासन दिले आहे. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तीन दिवसांत बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version