कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत भारतातून एका माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.
९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून एका माहितीपटाला नामांकन मिळाले आहे. ‘रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट आहे. यापूर्वी या माहितीपटाला सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे दोन पुरस्कारही मिळाले आहेत.
हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला दहा नामांकने मिळाली आहेत.
हे ही वाचा:
मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!
पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
….म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा झोमॅटो कंपनीवर भडकले
सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागासाठी ‘बेलफास्ट’, ‘कोडा’, ‘डोन्ट लूक अप’, ‘डय़ुन’, ‘ड्राईव्ह माय कार’, ‘किंग रिचर्ड’, ‘लिकोरिस पिझ्झा’, ‘नाईटमेअर अॅली’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे आता हा मानाचा पुरस्कार कोणाकोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.